Skip to main content

लेख

आणि मुंबईत धावले वाफेचे इंजिन...

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 16/04/2022 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील बोरीबंदर ते ठाणेदरम्यान आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली 16 एप्रिल 1853 रोजी. त्या ऐतिहासिक घटनेचे आता 170 वे वर्षे सुरू झाले आहे. यंदाच्या 170व्या वर्षाच्या निमित्ताने 20 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी भारतीय रेल्वेचे 150वे वर्ष सुरू झाले होते. त्या निमित्ताने 16 एप्रिल 2002 रोजी मुंबईत एका वेगळ्याच घटनेचे साक्षीदर होण्यासाठी लाखो मुंबईकरांनी बोरीबंदर ते ठाणेदरम्यानच्या लोहमार्गांच्या दुतर्फा, जिथे जागा मिळेल तिथे गर्दी केली होती. अगदी 16 एप्रिल 1853 ला केली होती तशीच. सगळेच जण ज्या दिवसाची वाट पाहत होते तो खास दिवस अखेर उजाडला होता.

फ्रेंच राष्ट्रपतींचा राजप्रासाद

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 08/04/2022 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
पॅरिसमध्ये एलिझे पॅलेस (फ्रेंच भाषेतील नाव – Palais de l’Élysée) उभारला जाईपर्यंत तो परिसर गुरांना चरण्यासाठीचे माळरान म्हणूनच वापरला जात होता. 17व्या शतकात या जागेचा मूळ मालक अर्मांद-क्लाऊद मोलेत याने ही जागा हेंरी लुईस दे ला तूर द’आउव्हर्गन याला विकली. त्यानंतरची अनेक वर्षे या परिसराची मालकी वेगवेगळ्या व्यक्तींकडे जात राहिली. त्यामुळे त्या जागी 17व्या शतकात उभारलेल्या टाऊन हॉलच्या रचनेमध्येही सतत बदल होत राहिले. या राजवाड्याचे अगदी अलीकडचे नुतनीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर करण्यात आले होते. सोळाव्या लुईकडे या राजवाड्याची मालकी आल्यावर येथे विशेष राजदुतांच्या निवासाची सोय करण्यात आली होती.

पुण्यात मेट्रो धावू लागली!

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 19/03/2022 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे.

बुरा ना मानो आज होली है !!

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 17/03/2022 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
थोडं उत्तेजक पण तरीही सवंग नसलेले , किंचीत कलात्मक, जरा वेगळं आपल्याला लिहीता येतं का याचा शोध घेतोय,कृपया हलके घेणे. मागे एक दोन बालकथा लिहील्या, त्या मलाच आवडल्या, त्यानंतर मोठ्यांनी काय घोडं मारलयं, त्यांच्यासाठी कथा नको का ? असा विचार केला....एक प्रयत्न... ----------------------------------------------------------------------- समोरची दारात रांगोळी काढत होती, दोन्ही हातात रंग घेऊन तो गेला. "ओह रंग....नको म्हणून" ती वळली, "असं कसं...

ऑपरेशन गंगा

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 12/03/2022 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेल्या संघर्षामुळे सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले. यासाठी हाती घेण्यात आलेले ऑपरेशन गंगा 10 मार्चला संपन्न झाले. या मोहिमेत भारतीय हवाईदलाबरोबरच एअर इंडिया, एअर एशिया, स्पाईसजेट, इंडिगो, विस्तारा आणि गो फर्स्ट या विमान कंपन्यांची विमानेही सहभागी झाली होती.

मराठी भाषा दिन

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 27/02/2022 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा ! – कुसुमाग्रज मिसळपाव परिवारात सामील झाल्यावर सुरुवातीला काही कवीता, मनोगते,मुक्तके राजभाषा हिन्दी मध्ये लिहिल्या, प्रतीसाद संमिश्र आले, गदारोळ माजला, टपल्या, टोमणे,काही शालजोडीतले, काही पुणेरी वर वर स्तुतीपर पण सरळ कसोट्यालाच हात घालणारे. माय मराठीत जन्मलो पण कमी वयातच दूर जावे लागले म्हणून सहवास कमी लाभला. राजभाषेचा सहवास भरपूर. दोघींवर तितकेच प्रेम. आता परत माय मराठीच्या कुशीत आल्या मुळे मराठी भाषेतील अमूल्य रत्ने दृष्टीक्षेपात आली.

माली पुन्हा अस्थिर

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 26/02/2022 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाकडे सध्या जगाचे लक्ष लागले आहे. पण त्याचवेळी तिकडे आफ्रिकेमध्ये मालीमधून फ्रेंच सैन्याला आपली मोहीम अर्ध्यावर सोडून माघार घ्यावी लागली आहे, तीही घटना जगात चर्चेचा विषय ठरली आहे. फ्रांसने आपली मोहीम गुंडाळण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच तेथील जिहादी गटांच्या कारवायांनी वेग घेतला आहे. फ्रांसने पुढाकार घेऊन 2013 मध्ये सुरू केलेल्या Operation Serval नंतर मालीमधील जिहादी गटांवर काही प्रमाणात नियंत्रण आले; पण त्याचवेळी या गटांनी आपलं कार्यक्षेत्र मालीच्या आजूबाजूच्या देशांमध्येही विस्तारलं. या मोहिमेतून जिहादींविरुद्ध मोठ्या प्रमाणात आघाडी उघडली गेली.

मी मोठा झालो.

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 25/02/2022 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी शाळेतून आल्यावर, हात-पाय धूऊन चहा पीत होतो, तेवढ्यात संज्या निरोप घेऊन आला.. "गुरं बाहेर काढताहेत, तुला बोलावलंय! "थांब जरा," मी म्हणालो. आईला संज्यासाठी चहा आणायला सांगून, जावं कि, न जावं, या विचारात बुडून गेलो. शाळेचा गृहपाठ करायचा होता. तिकडं गेलो तर बराच उशीर होणार. माझं दहावीचं वर्ष, शाळेच्या पहिल्याच दिवशी सरांनी भलं मोठं भाषण दिलेलं, "या वर्षी तुम्ही दहावीला आहात, लक्षात ठेवा. खेळ बंद... दांड्या मारायच्या नाही...