Skip to main content

लेख

सायोनारा s s

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी सोमवार, 18/06/2012 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
सायोनारा s s नोकरी निमित्त दहा वर्षे पैठणला होतो. (१९७९ ते १९८९). त्यावेळी आलेले हे दोन अनुभव. औरंगाबाधून फोन आला. विद्यापीठात एक आंतरराष्ट्रीय परिषद होती आणि त्यासाठी आलेले एक जपानी प्रतिनिधी मला भेटू इच्छित होते. हे जपानी कनेक्शन माझ्या काही लक्षात येईना. निरोप अर्जंट होता. लगोलग मी गेलो. ते प्रतिनिधी कामात होते. पण त्यांनी निरोप ठेवला होता. मला गेस्ट हाऊस वर बोलावलं होतं. मी गेलो. ते प्रतिनिधी माझी वाटच पहात होते.

शेअर बाजाराची प्राथमिक माहिती

लेखक सदानंद ठाकूर यांनी सोमवार, 18/06/2012 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी म्युच्युअल फंड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळावर शेअर बाजारासंबंधी माहिती देणारी दिर्घ लेखमाला सुरु केली असून दर सोमवारी व गुरुवारी एक लेख या प्रमाणे पुढील सहा महिन्यात एकूण सुमारे ५० ते ५५ लेखातून शेअर बाजाराशी निगडीत – भांडवली बाजार, फ्युचर्स, ऑपशन्स व म्युच्युअल फंडाची माहिती देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

मेसोअमेरिका(४.३) - माया (The Architects)

लेखक किलमाऊस्की यांनी रविवार, 17/06/2012 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
मेसोअमेरीका(४.२) - माया (The Mathematicians) " How much human life lost in wait" या वाक्यावर Indiana Jones (& the kingdom of Crystal Skull) येऊन थांबतो. सिनेमागृहाबाहेर पडताना स्टिवन स्पिलबर्गसारख्या दिग्दर्शकाने एकाच सिनेमात इतक्या घोडचुका कराव्या याचंच राहून राहून आश्चर्य वाटू लागतं? त्याची बखोट पकडून विचारावंसं वाटलं, "बाबा रे, पेरुवियन जंगल दाखवलंस, त्यात तुला केचुआ बोलणारी लोक कुठे भेटली?" पेरुच्या जंगलात हवाईयन धबधबे, माणूस खाणार्‍या मुंग्या आणि सुप्रसिद्ध नाझ्का (Nazca) लाईन्ससुद्धा?

एलियन आणि प्रॉमिथियसच्या निमित्ताने ...

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 13/06/2012 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट बघणं हा कधीकधी त्या चित्रपटापेक्षा त्याच्या कथादुनियेत रमवणारा एक अनोखा अनुभव असू शकतो. म्हणजे ज्या इहलोकात तो घडतो, ज्या जगाचे परिमाण त्या चित्रपटाशी आणि त्याच्या पटकथेशी निगडीत असतात तेच कित्येकदा आपणास अत्यंत समाधानकारक अनुभव देऊन जाऊ शकतात. सायन्स फिक्शनचे काल्पनिक जग हे एका कलाविष्कारापुरताही सीमित असू शकते जसे "वॉर ऑफ द वर्ल्ड"चे जग; म्हणजे आधी कॉमिक्स आणि नंतर स्टिवन स्पीलबर्गने टॉम क्रुसला घेऊन बनवलेल्या चित्रपटात दाखवले गेलेले.

जानी दुष्मन एक अनोखी प्रेम कहानी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/06/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.

राणी ताराबाई

लेखक sneharani यांनी शनिवार, 09/06/2012 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा गौरवशाली "शिवइतिहास" घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने!सह्याद्रीचे कणखर कडे, गड, किल्ले, बुरुज आज ही इतक्या दीर्घ कालाने शिवइतिहासाची साक्ष देतात. स्वातंत्र्य हा मानवाचा मुलभूत हक्क आहे याची जाणीव झाल्यावर त्या थोर पुरुषाने स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला अन् मावळ्यांच्या सहाय्याने स्वराज्य स्थापनेचा इतिहास ही घडविला. हा इतिहास नुसताच घडत नाही गेला तर तो इतक्या विविध पैलूंनी समृध्द होत गेला की आजमितीस एखादी घटना अभ्यासताना मानवी मन थक्क झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित!

फूटबॉल युरो चषक - २०१२ : शुभारंभ आणि गुणतक्ता

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 08/06/2012 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. क्रिकेटचा वर्ल्डकप झाला आणि भारतात दिवाळी साजरी झाली, त्यानंतर सगळ्यांचा जीव लटकवुन ठेवलेले तेंडल्यांचे शतकांचे महाशतक झाले आणि पुन्हा एकदा लोकांनी दिवाळी केली. झालेच तर क्रिकेटचे भारतीय धंदेवाईक व्हर्शन 'आयपीएल' ही झाले. मध्यंतरी बुद्धिबळ विश्वचषकही झाला आणि विश्वनाथन आनंदने तो जिंकुन कमाल केली. सध्या फ्रेंच ओपन स्पर्धेचा धुमाकुळही चालु आहे आणि नदाल नेहमीसारखा क्ले कोर्टवर एकेक प्रतिस्पर्ध्यांना शब्दशः धूळ चारत आहे.

मेसोअमेरीका(४.२) - माया (The Mathematicians)

लेखक किलमाऊस्की यांनी बुधवार, 06/06/2012 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
"Nature to him (Newton) was an open book, whose letters he could read without effort." - Albert Einstein
आल्बर्ट आईन्स्टाईनचं हे वाक्य मायन्सना तंतोतंत जुळणारं. आपल्या आसपास असणारा निसर्ग आपला गुरू. तो आपल्याला दोन्ही हातांनी भरभरुन देतो. पण त्याच बरोबर त्याची विविध रुपं, नाना छटा, एक ना अनेक तर्‍हा. निसर्गातील सूक्ष्मातीसूक्ष्म फरक अचूक मोजून मापून नोंदवण्याची मायन्सची धडपड. एक झपाटलेपणच म्हणा ना! मग त्यातूनच जन्म झाला त्रिकालाबाधित कालमापन पद्धतीचा, अदभूत खगोलशास्त्राचा आणि अमेरिका खंडातल्या पहिल्यावहिल्या प्रगत अंकपद्धतीचा.

जगज्जेता विशी!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 05/06/2012 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या १२ वर्षात तो पाच वेळा जागतिक अजिंक्यपदाचा मुकुट डोक्यावरती चढवून आहे (ही 'तपःश्चर्याच' म्हणायला हवी! :)) , जगातले अनेक प्रतिस्पर्धी बुद्धीबळपटू त्याच्या खेळाला वचकून असतात, गॅरी कास्पारोवसारखा त्याचा एकेकाळचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि नंतरचा सहकारी देखील त्याच्याबद्दल अनुदार उद्गार काढतो तेव्हा तो एका अढळपदाला पोचलाय याची खात्रीच होते! ३१ मे २०१२ ला मॉस्कोतल्या त्रेत्याकोव आर्ट गॅलरीमध्ये 'जन गण मन' वाजलं, आनंदने विजेतेपदाचा चषक उंचावला आणि माझे डोळे भरुन आले!

मेसोअमेरिका(४.१) – माया ( Mysterious Mayans)

लेखक किलमाऊस्की यांनी शनिवार, 02/06/2012 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
मेसोअमेरिका (३) - झापोतेक (The People) जगाच्या पाठीवर एकाच वेळी ठिकठीकाणी अनेक संस्कृती नांदल्या, बहरल्या. काही काळाच्या ओघात नष्ट झाल्या तर काही आपला वारसा पुढच्या पिढीला देऊन लुप्त झाल्या. मेसोअमेरीकेच्या इतिहासातील माया संस्कृती ही अशीच एक. ‘२०१२ - जगाचा अंत – माया कॅलेंडर“ या तीन गोष्टींच्या परस्पर संबंधामुळे आजच्या जगाला माहित असलेली. बरीचशी गूढ आणि रहस्यमय अनेक दंतकथांमधून अजरामर झालेली. युरोपात रोमन साम्राज्य लयास जात असताना जगाच्या दुसर्‍या टोकाला अमेरीका खंडात प्रगत “माया” संस्कृती” बहरास येत होती.