Skip to main content

लेख

नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 21/08/2012 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
(जानेवारी २०१२ मध्ये माझ्या नागावातील घराबद्दल लिहिलेला लेख मिपाकरांसाठी देत आहे) नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण. मुंबई ला जवळ, शनिवार/रविवार प्रचंड गर्दी असलेला one day picnic spot. पण या कारणासाठी नागावची ओढ नाही. तर ओढ आहे ती या मातीची, निसर्गाची … तिथल्या सगळ्याचीच. नागांव चे वास्तव्य म्हणजे मला लागलेलं एक व्यसनच आहे म्हणा हवे तर. दोन महिने तिथे गेलो नाही तर जीव घुटमळत होता. शेवटी १३ जानेवारीच्या रात्री जायचा योग आला …. तसा तो ओढून ताणूनच आणला. बऱ्याच कामांना टांग दिली आणि गाडी रेमटवत रात्री १२:३० ला बंगल्याच्या आवारात पोचलो.

"प्रे (सावज)" एक थरकापवून टाकणारी विज्ञान कादंबरी

लेखक सागर यांनी शनिवार, 18/08/2012 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकाचे नावः प्रे (सावज) मूळ लेखकः मायकल क्रायटन अनुवादकः प्रमोद जोगळेकर प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस किंमत : रु. ३००/- मायकल क्रायटन हे नाव आता मराठी वाचकांना अपरिचित राहिलेले नाहिये. जुरासिक पार्क, लॉस्ट वर्ल्ड, डिस्क्लोजर, काँगो अशा कित्येक कादंबर्‍या मायकेल क्रायटनने लिहिल्या आहेत व त्याच्या कादंबर्‍यांवर बेतलेले हॉलिवूड मधील हे इंग्रजी चित्रपटही अतिशय गाजलेले आहेत. अतिशय थरारक अशी कथानकाची रचना करणारा लेखक म्हणून मायकल क्रायटन सर्वांना परिचित आहेच.

मैत्रीच्या नाण्याची दुसरी बाजू --- एक कडवाहट सच

लेखक कुलमयु यांनी गुरुवार, 16/08/2012 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार "मैत्री दिन" म्हणून ओळखला जातो.प्रत्येक वेळी आपण मैत्रीचे गोडवे कायम गात असतो पण त्याच "कडवाहट सच" पण पाहू कधीतरी. मैत्रीतच कधी स्वार्थही दडलेला असतो.(सगळ्याच नाही),मला एक जाहिरात आठवली "जो तेरा है वो मेरा है, जो मेरा है वो तेरा है " पण सध्या उलट आहे "जो तेरा है वो मेरा है जो मेरा है वो भी मेरा है " अशी सद्यस्थिती आहे .हल्ली सोशल नेट्वर्किंगच्या माध्यामातून बिझनेसच्या फायद्यासाठी मैत्री करतात. त्यात गुन्हा नाही उलट मैत्री मदतच करेल . पण जो त्यात मदत करू शकत नाही म्हणून त्याची मैत्रीची किंमंत शून्य करावी हे चूक आहे. माझ्या अनुभवात मी कायम स्वार्थच अनुभवला.

सरदार अजितसिंह यांना आदरांजली

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 15/08/2012 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
ajit singh सरदार अजितसिंह यांचा जन्म नवान्शहर तहसिलातील खट्करकलान येथला. जन्मदिवस दिनांक २ फेब्रुवारी १८८१. ज्या कुळात जन्म घेतला ते सिंधु कुल म्हणजे साक्षात क्रांतिचा कल्पवृक्ष. सरदार अजितसिंहांचे वडील सरदार अर्जुनसिंह हे प्रखर राष्ट्रवादी आणि आधुनिक विचारसरणीचे. आपले ईंटर आर्ट्स चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी सुरू केली.