Skip to main content

लेख

युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१)

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 19/02/2013 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
न पुसला जाणारा कलंक! १९३९-१९४५ गॅसचेंबरकडे.............. Simple, Free Image and File Hosting at MediaFire आजकाल पहाट शत्रू म्हणूनच उजाडते. असे वाटते की उगवणारर्‍या सूर्याने आमच्या विध्वंसासाठी आमच्या शत्रूशी हातमिळवणी केली आहे की काय ! - प्रायमो लेव्ही – "If this is a man" या पुस्तकात १९४६ मधे.

प्रेम दुसरं काय...!!!

लेखक उर्जिता यांनी गुरुवार, 14/02/2013 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
yes..! माझं प्रेम आहे..! म्हणजे माझं, प्रेम या कल्पनेवर आणि सतत प्रेमाच्याच प्रेमात पडुन आयुष्यभर प्रेमात डुंबुन राहण्यावर प्रेम आहे.प्रेम हे खरंतर नकळत ,आणि अगदी क्षणार्धापेक्षा कमी वेळामधे घडून जाणारं, आणि नंतर खोल खोल रुजत जाऊन प्रत्येक क्षण भारवून टाकणारं कोडं. त्याला कोडं म्हणा किंवा गणित(गणिताईतकी नीरस उपमा का देतात देव जाणे..! )ते सोडवण्यापेक्षा त्याच्या हातात हात घालून आयुष्यभर त्याच्या धुंदीत जगण्याईतकं सूख कशातच नाही. मी सतत प्रेमात पडते.! हो ना .. कारण पडणं हीच एक अशी गोष्ट आहे जी झाल्यावरच कळते. बर आणि प्रेमात पडण्याचे माझे ठोकताळे , नियम (so called criteria)असं काही नाही.

ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा.

लेखक बॅटमॅन यांनी गुरुवार, 14/02/2013 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रोजन युद्ध पहिला भाग. ट्रॉयच्या मोहिमेला निघाल्यावर ८ वर्षे भरकटण्यात आणि त्यानंतरची ९ वर्षे इतर चकमकींत गेल्यावर मग लोक जागे झाले. तद्वतच पहिल्या आणि दुसर्‍या लेखात लै अंतर आहे, पण इथून पुढचे लेख जरा लौकर येतील हे नक्की. :) इलियडच्या आधीची अतिसंक्षिप्त पूर्वपीठिका: अखेरीस ८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ग्रीक आरमारी ताफा ट्रॉयला जाण्यासाठी सज्ज झाला. ट्रॉयला येऊन ९ वर्षेही उलटून गेली.

आणखी एक टायटॅनिक

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 12/02/2013 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षीची गोष्ट आहे, जानेवारीचा दुसरा पंधरवडा.. मुळचा मुंबईचा रहिवासी असलेला केविन रिबेलो समुद्रात अर्धवट बुडालेल्या अजस्त्र धुडाकडे आशेने बघत बसला होता...कोणत्याही क्षणी रेस्क्यू टीम आपल्या भावाला , रसेल ला घेऊन येईल या आशेत गेला आठवडा तसाच काढला होता.”या क्रुझ असाइनमेंट मधून चांगले पैसे मिळतील, थोड्याच वेळचा प्रश्न आहे” असे त्याच्या भावाचे क्रुझवर जाण्याच्या आधीचे शब्द त्याला आठवत असावेत...रेस्क्यू टीमला आता कोणी जिवंत असण्याची शक्यता वाटत नव्हती... दुसरीकडे सर्वत्र अपघाताच्या बातम्या टी.व्ही.

रंगरेखा कलेचे-( Graphics) चे जग असते कसे ?

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 10/02/2013 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी देहाला पांच संवेदना इंद्रिये आहेत त्यात त्चचेखालोखाल डोळा हे महत्वाचे संवेदना इंद्रिय आहे. कारण याने पाठविलेले संदेश ग्रहण मेंदूने करून बर्‍याच गोष्टीचे आकलन आपल्याला होत असते. डोळया पेक्षा त्चचेचे स्थान महत्वाचे असायचे कारण परिसराची अधिक महत्वाची माहिती उदा. तापमान त्वचा करून देते हे होय. ज्ञानासाठी मात्र डोळयाचे महत्व अनन्य असे आहे. डोळ्यातील सूक्ष्म रचनेमुळे आपल्याला रंगाचे , मितीचे, व आरेखनाचे ज्ञान होते. या तिन्ही मूलभूत घटकानी मिळून ज्याचे प्रकटीकरण होते त्यास ग्राफिक्स असे म्हणू या.

हे' शास्त्रीय संगीत ' हाय तरी काय राव ? भाग ३

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 09/02/2013 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
भारत देशात अभिजात संगीताच्या दोन शैली प्रामुख्याने आढळतात. त्यात हिन्दुस्थानी शैली व कर्नाटक शैली असे दोन प्रकार आहेत.वापरले जाणारे ताल, साथीसंगतीची वाद्ये व सादरीकरण ( यात आवाजाचा लगाव,. तान क्रिया ई चा समावेश ) यात मूलभूत फरक आहे. रागांचे वर्गीकरण करण्याचीही पद्धत वेगवेगळी आहे. पण या गुंतागुन्तीच्या विषयात आपल्याला शिरायचे नाही.कारण ऐकले तर आवडते पण का आवडते हे समजत नाही अशी अवस्था असलेल्या रसिकाला समोर ठेवून ही मालिका लिहिली जात आहे. हिंद्र्स्थानी अभिजात संगीतात घराणी नावाचा एक प्रकार आहे. त्या बद्द्ल एवढेच आपण समजून घ्यायचे आहे की घ्रराणे म्हणजे सादरीकरणाची शैली.

अक्षय कविता

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 08/02/2013 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
तुला कसे कळत नाही? फुलत्या वेलीस वय नाही! क्षितिज ज्याचे थांबले नाही, त्याला कसलेच भय नाही, त्याला कसलाच क्षय नाही.... असाच काहीसा अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली बोरकरांची लख्ख आरस्पानी कविता. लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी, अशी. कवितेची जातकुळीच अर्थगर्भित. चित्रवाही शब्दकळेचे लेणे ल्यालेली. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाला तितक्याच समरसतेने आपलंसं करुन, अनुभवून आपल्या अवधूती मस्तीत धुंद होताना, त्या अनुभवांचा मुक्त उद्घोष करणारी, शुद्ध अभिजात अशी ही कविता. आत्मनिष्ठ.

'स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' (लोकसत्ता - शरद जोशींचे सदर)

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 06/02/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे 

                                                                       

मि. पा. (का. घो. आ. फे.) मुंबई कट्टा पंचनामा - पुरवणी

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 06/02/2013 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
आदिजोशीने दिलेला 'आँखो देखा हाल' फक्त चर्चगेटहून आलेल्या मिपाकरांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएम) कडून आलेल्या लोकांची संख्या जास्त होती, पण त्यातल्या कुणीच काही लिहिले नाही आणि बहुधा त्यांनी आदीला 'फीडबॅक' दिला नसेल म्हणून त्यानेही त्यांच्याबद्दल फारसे लिहिलेले दिसत नाही. त्यामुळे मीच पुढाकार घेऊन चार ओळी लिहायचे ठरवले. हे जर प्रतिसादात दिले असते तर कुणी वाचले नसते असे मला वाटले म्हणून वेगळा लेख लिहिला आहे. मला मिळालेल्या संदेशानुसार मी बरोबर ११ वाजता बृ.मुं.म.न.पा.च्या बहिर्गमनद्वारापाशी (एक्झिटगेटजवळ) जाऊन पोचलो. तिथे दोन तरुण उभे होते.