Skip to main content

लेख

सेव्हन हॅबिट्स सारांश (भाग - २ अंतिम)

लेखक सुधीर यांनी मंगळवार, 16/07/2013 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १
व्यक्तिगत आयुष्यात प्रगती कडे नेण्यार्‍या सवयी कुठल्या हे आपण पहिल्या भागात पाहिले. या भागात आपण सामाजिक यश काय ते पाहू. व्यक्तिगत यश हे सर्वप्रथम येते त्यानंतरच मग सामाजिक यश! सामाजिक यशाशी निगडित असलेल्या पुढल्या सवयी ह्यात पुस्तकाचा खरा आत्मा आहे. या पुस्तकानंतर काही शब्द जनमानसात प्रचलित झाले. जसे विन-विन, पी-पिसी वर्क, पॅराडाईम शिफ्ट वगैरे. पुढल्या तीन सवयींची ओळख करून देण्याअगोदर काही संकल्पना समजवून घेऊ आणि मग उरलेल्या सवयी पाहू.

सेव्हन हॅबिट्स सारांश (भाग - १)

लेखक सुधीर यांनी सोमवार, 15/07/2013 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकाच्या दुकानात सेल्फ-हेल्प नावाचं एक दालन असतं, त्याच्या वाट्याला जाण्याचं फारसं काही कारण नव्हतं. केवळ कुतूहल म्हणून मी नुकतीच प्रकाशित झालेली काही पुस्तकं वाचायचा प्रयत्न केला. पण का कुणास ठाऊक ज्ञानामृत का बोधामृताबरोबर झोपेचा डोसही फ्री मिळतो की काय असा प्रश्न पडायचा. म्हणजे नुकतीच पूर्ण झोप झाली आहे, चहा पाण्याचा कार्यक्रमही आटपलाय आणि यातल्या काही पुस्तकांपैकी एखादं हाती घेतली की हमखास अर्ध्या तासात डुलकी लागते. बरं त्यातून फारसं काही हाती गवसतं असही नाही आणि गवसलं तरी प्रत्यक्षात अमलात आणलं जातं का, हाही एक प्रश्न असतो.

केस

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 13/07/2013 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
' केस ' 10 April 2013 तारखेला 11:58 AM वाजता डोक्यावरचे केस हा प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वाचा महत्वाचा भाग असतो. काही लोक निव्वळ केसांमुळे ओळखले जातात आणि प्रसिद्ध होतात. काही निव्वळ केस नाहीत म्हणून ओळखले जातात. अनेक सेलिब्रिटींचे केस हीच त्यांची ओळख असते. उदा. बच्चन, अनुपम खेर वगैरे. एपीजे अब्दुल कलाम आणि तत्सम महान लोक यांचा आपण इथे अपवाद करुयात. कारण हे लोक त्यांच्या कर्तृत्वाने जेवढे ओळखले जातात, तेवढेच त्यांच्या केसांमुळे ! समजा अनुपम खेर यांच्या डोक्यावर शोले चित्रपटातील बच्चनच्या केसांचे रोपण केल्यास कसे वाटेल ?

काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 12/07/2013 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १ होजाने अल्लाचा प्राण वाचविला त्याची गोष्ट - बायझिडच्या मशिदीजवळ एका मदरसेत म्हातारा ‘होजा’ लहान मुलांना मोठ्या तन्मयतेने शिकवीत असे. सर्व पुस्तकांचा राजा ‘कुराण’ त्या लहानग्यांना शिकवताना त्याचा ऊर आभिमानाने भरुन येत असे तर कधी कधी त्याच्या डोळ्यात पाणी तरळल्याचाही भास होई.

माझे चाट जीवन

लेखक देवांग यांनी गुरुवार, 11/07/2013 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष २०००. .. कसा तरी मेक्यानिकॅल डिप्लोमा झालो. पुढे काय? (हा प्रश्न माझ्या घरच्यांना पडला होता मला नाही). घरच्यांना वाटले होते १० वि मध्ये ८४ % मिळाले म्हणजे पोरगा इंजिनीर वैगेरे होईल.पण मला तेव्हा हि समजत नव्हते आणि खरे सांगायचे तर आजही माहित नाही मला काय पाहिजे, मला काय आवडते, मला काय करायचे आहे. असो .... काही मित्रांनी BE ला admission घेतली, तर काही जन नोकरी करू लागले. मित्रांचे बघून मी पण BIO data बनवला. कुठून तरी application लेटर ढापले आणि जोब साठी apply करू लागलो. पण interview call येवील तर शपथ. . .

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (५)

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 09/07/2013 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसभर पायाला भिंगरी लावलीय, असे धावपळीचे आयुष्य आम्हा मुंबईकरांचे. संध्याकाळी परतताना मात्र पळत सुटायचे काम ट्रेनवर सोपवून आम्ही निवांत बसतो.. नेहमीचेच कंपार्टमेंट, अन आवडीचीच जागा, पण नेहमीच काही गप्पा मारल्या जात नाहीत किंवा पुरेश्या मारून झाल्या की आपापल्या आवडीनुसार हाताला चाळा अन बुद्धीला खाद्य पुरवायला सुरुवात होते. ती मोबाईल गेम्स उघडते, तर मी माझ्या तोडक्यामोडक्या ईंग्रजीच्या भरवश्यावर न्यूजपेपरमध्ये शिरतो. आजही तसेच काहीसे.. मांडीवर ठेवलेल्या पेपर वरून नजर भिरभिरवत सहज सवयीनेच एक नजर उजवीकडे तर एक नजर डावीकडे.. तर फिरून पुन्हा आणखी एक नजर उजवीकडे फिरवली..

गेटींग थिंग्स डन - डेव्हीड अ‍ॅलन

लेखक सुधीर यांनी रविवार, 30/06/2013 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
कधी असं होतं का? एखादं काम करायचं आहे हे आपल्याला फार पूर्वी लक्षात आलेलं असतं. पण इतर महत्त्वाच्या कामांच्या उपद्व्यापात आपण ते छोटंसं काम पूर्णपणे विसरून जातो आणि मग एक वेळ अशी येते की ते काम "आज, आता, ताबडतोब" म्हणून बोंबलतं. मग हातातली सगळी इतर कामं सोडून आपल्याला त्या कामाच्या पाठी लागण्याशिवाय गत्यंतर नसतं. असं बर्‍याच वेळा होतं आणि सगळी कामं सोडून ते काम करण्यात फारसं विशेषही नसतं. पण कधी कधी असं झाल्याने आपल्याला चांगलाच आर्थिक वा इतर फटका पडतो.