Skip to main content

लेख

डस्ट इन द विंड

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 21/08/2013 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसांची एखादी सवय, एखादा विचार मनात कायमचं घर करून राहतो. या व्यक्तीचंही असंच होतं. 'होतं' म्हणताना वाईट वाटतंय, कारण त्याचं जाणं अगदीच अनपेक्षित होतं. आमच्या बाजूच्या कॉलनीत हा भाजीवाला गेले अनेक महिने भाजीची गाडी लावायचा. जाहिरातींवर कोट्यावधी खर्च करूनही मोठाल्या दुकानात चार दोन टकलीच फिरकतात अशा काळात याच्या भाजीच्या गाडीवर संध्याकाळी तो असेस्तोवर सतत गर्दी असायची. सेल, डिस्काउंट ही गर्दीची कारणं नव्हती. त्याचे युएसपी होते, त्याचा हसरा चेहरा, अगत्य, आपुलकी, आणि त्याने जपलेलं एक सात्विक माणूसपण.

यात्रा जत्रा काल आणि आज

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी सोमवार, 19/08/2013 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू मधील सैन्य छावणीत (Caluchak) एक रात्र राहण्याचा योग २००२ साली आला होता. तेथील सर्व धर्म पार्थना स्थळ विशेष लक्षात राहिले ते तेथे भेटलेल्या एका धर्मगुरू मुळे. आज उत्तराखंड मधील आपत्ती नंतर त्यांची पुन्हा आठवण झाली. आमच्या अमरनाथ यात्रेला शुभेच्या देताना त्यांनी जे प्रबोधन केले तसे प्रबोधन भारतातील कोणी धर्मगुरू करेल का? काय सांगितले होते त्या अवलियाने ? भारत हा यात्रेकरूंचा देश आहे , प्रसार माध्यमे जेव्हा उपलब्ध नव्हती तेव्हा या यात्रांना खूप महत्व होते. या यात्रा म्हणजे समाज जोडण्याचे एक महत्वाचे साधन होते. संत महंतांनी संपूर्ण देशाची परिक्रमा करून का देश जोडला होता.

कपिल व गांगुलीने निवडलेले एकदिवसीय क्रिकेटचे भारताचे सर्वकालीन सर्वोत्तम संघ

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 17/08/2013 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचा महान अष्टपैलू खेळाडू कपिलदेव याने नुकताच त्याच्या मतानुसार एक-दिवसीय क्रिकेटमधील भारतातील सर्वकालीन सर्वोत्तम १२ खेळाडूंचा संघ निवडला. त्याच्या सर्वकालीन सर्वोत्तम एकदिवसीय संघात खालील खेळाडू आहेत. धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सचिन, सेहवाग, गांगुली, कोहली, अझरूद्दीन, युवराज सिंग, झहीर खान, श्रीनाथ, हरभजन, कुंबळे, रविंद्र जडेजा (१२ वा खेळाडू) त्याच्यापाठोपाठ गांगुलीने देखील स्वत:च्या मताने भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ निवडला.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - १

लेखक तिरकीट यांनी शनिवार, 17/08/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .. मिपावर माझे हे पहीलेच लिखाण आहे. कुठला विषय घ्यावा हा विचार करताना असं मनात होतं की मिपावर आत्तापर्यंत माझ्या वाचनात न आलेला विषय घ्यावा. आपल्याकडे अश्या अनेक गोष्टी वारसा असल्यासारख्या आल्या आहेत की ज्या नवीन पिढीला वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत, घरातील थोरा-मोठ्यांचे बघून, ऐकून त्या लहान मुलांपर्यंत पोहोचतात..मग त्यामध्ये रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी यांसारखी घरोघरी म्हटली जाणारी स्तोत्रं असोत किंवा क्रिकेट सारखे खेळ असोत. याचसारखी अजून १ गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे 'गीतरामायण'...

धाडस ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 14/08/2013 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
लाकडी पुलावर जमलेल्या गर्दीचा कोलाहल क्षणाक्षणाला वाढत होता.. मी मी म्हणवणारे पट्टीचे पोहणारे पाण्याच्या उग्र रुपाला पाहून दबकले होते.. त्या बेफाम प्रवाहात काळ्या कातळांशी सामना म्हणजे आत्महत्याच जणू.. खुद्द तिच्या बापाने आशा सोडली होती.. इतक्यात पैलतीरावरून तीरासारखा तो धावत आला आणि मासोळीसारखा पाण्यात झेपावला.. काही काळासाठी सार्‍यांचे श्वास रोखले गेले, मात्र तो तिला घेऊनच काठावर आला.. वाहव्वा..! सर्वत्र एकच जल्लोष..!! थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली..

शिव श्रावण आणि आपण

लेखक अनिल तापकीर यांनी मंगळवार, 13/08/2013 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार सज्जनहो, सध्या श्रावण महिना चालू आहे सर्व साधकांसाठी पर्वकालच जणू या महिन्यात कुठल्याही देवतेची केलेली साधना अधिक फलदायी असते. परंतु त्यातल्या त्यात हा श्रावण महिना भगवान शिवशंकरासाठी खूपच महत्वाचा मानला जातो . नेहमी म्हणजे रोजच्या जीवनात प्रत्येकजण 'जो आस्तिक आहे तो' सकाळी स्नानानंतर पूजा जमली नाही तर देवाला नुसता नमस्कार का होईना करूनच घराच्या बाहेर पडतो. परंतु श्रावण महिन्यात प्रत्येकाच्या या कृतीत जास्त सुधारणा होत असते. म्हणजे उपवास किंवा ठराविक दिवशी देवाला जाऊन येणे आदी. जमले तर एखाद्या सद्ग्रंथाचे वाचन आणि दिवसातून जमेल तसे देवाचे नामस्मरण अश्या गोष्टी आपोआपच होतात.

महाबलिपुरम

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 12/08/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख कलादालनात टाकावा की जम मध्ये याबद्दल जरा साशंक होतो. अखेर कलादालनात टाकायचे ठरवले कारण लिहिण्यासारखे माझ्याकडे फारसे काही नाही. न मला या इतिहासाबद्दल फारशी माहिती न महाबलिपुरमच्या प्रसिद्धा वास्तुशास्त्राबद्दल. त्यामुळे लिहिण्यासारखे फारसे काही माझ्याकडे नाही. परंतु कलादालनात काही एरर येत असल्याने परत जम मध्ये धागा टाकत आहे त्याबद्दल क्षमस्व. पण ही छायाचित्रे बघण्यापुर्वी थोडी माहिती ही हवीच. म्हणुन हा शब्दप्रपंच. महाबलिपुरम किंवा ममल्लपुरम हे भारतातल्या प्राचीन बंदरांपैकी एक.

वॅलेंटाईन डे ! ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 09/08/2013 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबादाप्रमाणे येणारा प्रेमदिवस.. उधळायला संस्कृतीरक्षकांची जय्यत तयारी होतीच.. निषेधाचे बॅनर शहरभर लागले होते.. कट्ट्यावरच्या राहुल’चीही तयारी झाली होती.. चॉकलेट परफ्यूम ग्रीटींग अन फुले... आणखी काय लागते..! गेल्या तीन वर्षांचा त्याचा रेकॉर्ड होता, एकही वॅलेंटाईन डे फेल गेला नव्हता.. यावेळी मात्र अंदाज फसला.. त्याला हसूनच नकार देत ती पुढच्याकडे वळली.. टाय विस्कटतच त्याने पुष्पगुच्छ जमिनीवर आदळला.. अर्थातच, अपमान अन पराभवाची निशाणी कोणाला आवडते ! ते निघून गेले अन एवढा वेळ जवळच उभी.. नुसतेच बघत असलेली ‘ती’ ... लगबगीने पुढे आली.. पडलेली फुले उचलून हृदयाशी कवटाळली..

सावल्या ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 07/08/2013 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
ते एक सुकलेले शेत होते एवढंच काय त्याला गाडीच्या बाहेर फेकले जाताना जाणवले.. चांदण्यांच्या प्रकाशात लुकलुकणारे चार सहा आठ डोळे आणि एक बारीकसा टॉर्चचा झोत.. त्यात दिसणार्‍या, अंगावर झेपावणार्‍या... जंगली श्वापदासारख्या उघड्या देहावर तुटून पडणार्‍या... काळ्याकुट्ट सावल्या..! त्यांचा स्पर्श, अंगाचा दर्प.. बीभत्स अन किळसवाणा.. त्याला दूर दूर फेकून द्यावेसे वाटूनही काही न करू शकणे.. एक असहाय्यता.. एक अगतिकता..... क्षणाला या सर्वांनी परीसीमा गाठली अन धापा टाकतच तो उठला.. उर नुसता धपापत होता..