Skip to main content

लेख

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ४

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 23/09/2014 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
१८३६ मध्ये पीटर वॉरन डीसने नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर प्रस्थान ठेवलं. डीसच्या मोहीमेत एकूण १२ जणांचा समावेश होता. मॅकेंझी नदीच्या मुखापासून पश्चिमेला पॉईंट बॅरो आणि पूर्वेला हडसनच्या उपसागरापर्यंत किनार्‍याने प्रवास करण्याची डीसची योजना होती. फोर्ट चिपेव्यॅन गाठून त्यांनी हिवाळ्यासाठी मुक्काम केला. १ जून १८३७ ला डीसने फोर्ट चिपेव्यॅन सोडलं आणि महिन्याभरात ग्रेट बेअर सरोवर गाठलं. तिथून निघाल्यावर ९ जुलैला त्यांनी मॅकेंझी नदीच्या मुखाने आर्क्टीकचा किनारा गाठला.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ३

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 22/09/2014 04:57 या दिवशी प्रकाशित केले.
१८१९ मध्येच विल्यम पेरीच्या नेतृत्वाखाली नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेने इंग्लंडहून प्रस्थान ठेवलं. एडवर्ड सॅबीन, फ्रेड्रीक विल्यम बीची यांचा या मोहीमेत समावेश होता. हेकला आणि ग्रिपर या दोन जहाजातून नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्याचा पेरीचा बेत होता. बर्फापासून वाचण्यासाठी जहाजाच्या सांगाड्यावर खनिजाचा लेप देण्यात आला होता. जहाजांच्या बाहेरील बाजूस ३ इंचाच्या लाकडाचा थर देण्यात आला होता. त्याशिवाय हवाबंद अन्नाचे डबे त्यांनी आपल्याबरोबर घेतले होते. इंग्लंडहून निघाल्यावर रॉसच्या मार्गाने न जाता पेरीने थेट लँकेस्टर साऊंडची दिशा पकडली. खाडीतील बर्फातून वाट काढत २८ जुलैला तो खुल्या समुद्रात पोहोचला.

"हमें तुमसे प्यार कितना.."

लेखक अन्नू यांनी रविवार, 21/09/2014 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ-सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरिप सॅमन्थाच्या तोंडावर पडली आणि नापसंतीदर्शक हुंकार भरत तिने तशीच आपली मान बाजुला कलती केली. रात्रीच्या झोपेची ती धुंदी अजुनही तिच्या डोळ्यांवरुन गेलेली दिसत नव्हती. त्या गोड झोपेच्या तंद्रीतच तिने पुन्हा एकदा आपली कुस बदलली. डावा हात पुढे टाकला. अन्.. नकळतच तिच्या चेहर्‍यावर मंद हसू उमटून गेले! आपल्या जडावलेल्या पापण्या हळूवाSरपणे उघडत तिने त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. तो तिच्या जवळच होता- मॅक.. तिचा मॅक! आणि ती आता त्याच्याच अंगावर हात टाकून स्वस्थ झोपली होती. हलकेसे स्मित करत तिने कौतुकभरल्या नजरेने त्याला न्याहाळले.

शिकार

लेखक कल्पतरू यांनी शनिवार, 20/09/2014 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी असाच एक योग येतो चार चौघांची चांडाळ चौकडी जमा होते आणि शिकारीला जायचा बेत ठरतो. आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम. लहानाचा मोठा झालो तो या गोष्टी ऐकतच. अगदी मला आठवतंय म्हणजे पहिली दुसरीत असताना दर आठवड्याला शिकारीच्या गोष्टी हमखास कानी पडायच्या. कधी तर सशाच्या, तर कधी लांडोर तर कधी भेकर , रानडुकराची शिकार म्हणजे सगळ्यात मोठी शिकार. याची शिकार जो करायचा तो आठवडाभर गावात त्याची छाती चार इंच फुगवून चालायचा.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - २

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 20/09/2014 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
९ मे १६१९ ला जेन्स मंक हा डेन्मार्कचा दर्यावर्दी युनिकॉर्न आणि लॅम्प्रे या दोन जहाजांसह नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर निघाला. नॉर्थवेस्ट पॅसेजमधून चीन आणि भारताचा किनारा गाठण्याचा त्याचा बेत होता. डेव्हीसच्या सामुद्रधुनीतून उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमणा करत त्याने ६९ अंश उत्तर अक्षवृत्त गाठलं. फ्रॉबीशरच्या उपसागरातून त्याने हडसनच्या सामुद्र्धुनीत प्रवेश केला. मात्रं या सामुद्रधुनीतून वाट काढण्यास त्याला तब्बल एक महिना लागला. सतत बिघडणारं हवामान आणि जोरदार आर्क्टीक वार्‍यांमुळे त्याच्या जहाजांची दयनीय अवस्था झाली होती.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 19/09/2014 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
मानवाने ज्या दिवसापासून सागरसंचाराला सुरवात केली आहे, त्या दिवसापासून पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या जलतत्वाच्या या सर्वात रौद्र अविष्काराशी त्याचं अनोखं नातं निर्माण झालेलं आहे. सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये आणि ग्रंथांमध्ये मानवाच्या सागराशी असलेल्या बंधाचे उल्लेख आढळतात. इजिप्शीयन आणि ग्रीक संस्कृती बहरल्या त्या भूमध्य समुद्राच्या सान्निध्यात तर द्रविडीयन संस्कृती बहरली ती हिंदी महासागर आणि त्याचे भाग असलेल्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काठी. पूर्णत्वास गेलेल्या संस्कृतींनी नित्यनवीन प्रदेशाची आस बाळगली होती.

“” प्रियेविण उदास वाटे आज “” ----- “”मेघदूत “” कविकुलगुरू कालिदासांची “आर्त विराणी”

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी मंगळवार, 16/09/2014 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढ श्रावणाचे दिस, कुंदधुंद पण मळभटलेलं, थोडसं उदास वातावरण, काहींसं हरवलेपण जाण-वणार, बाजूलाच कुठतरी पारव्यांचे घुटूर्घुम, अन् त्यात भर घालणारी अचानक त्या वातावरणाला पोषक अशी सुरावट कानी आली, “” रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात / प्रियावीण उदास वाटे आज “” श्रीमती शांताबाईच्या रसिल्या, भावनोत्कट काव्यपंग्तीच्या दुरून कुठूनतरी थोड्याशा आर्त विराणी लकेरी कानी आल्या अन आतुरलेले लोचनानी अंधारात प्रियतमाची अधीरतेने वाट पाहणारी म-दालसा नजरेसमोर उभी ठाकली.

थोडे अद्भुत थोडे गूढ - १० (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 16/09/2014 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
थोडे अद्भुत थोडे गूढ ही लेखमालिका आज संपली. ही लेखमालिका प्रकाशीत करु दिल्याबद्दल मी मिसळपाव प्रशासनाचा मनापासून आभारी आहे.

आठवणी : गुळमट तिखट कडू

लेखक मन यांनी रविवार, 14/09/2014 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
आताच लोकसत्ता वाचत होतो. खूप मज्जा येते ते तसले भारी शब्द वाचायला. व्यामिश्र, जनरेटा, उद्बोधक.... एकदम जुन्या गोष्टी आठवायला लागल्या. शाळेत असताना असे शब्द वाचले , की मी कुठेही ते शब्द ठोकून देत असे. उदा:- "मी आज व्यामिश्र खेळलो." "मला आज खूपच उद्बोधक वाटतय." किंवा "भाजीची चव उद्बोधक आहे." आज "शाळेत जनरेटा पोचला." . . "शी "ला विष्ठा म्हणतात समजेपर्यंत दुसरी तिसरीत कानावर पडलेला " शिष्टाचार " हा शब्द "विष्ठाचार ", "व्यभिचार " असा कसाही वापरायचो.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट

लेखक अमित खोजे यांनी रविवार, 14/09/2014 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
America was not discovered; it was built! अमेरिका सापडली नाही, ती उभारली गेली! हे एक प्रसिद्ध वाक्य मी बऱ्याच वेळेला ऐकले होते. नुकतीच 'The Men Who Built America' ही मालिका History channel वर बघितली. त्यामधील उद्योजकांच्या गोष्टी पाहून आश्चर्य तर वाटलेच परंतु अमेरिकेचा इतिहाससुद्धा समजला आणि वरील वाक्य तर शतशः पटले. या मालिकेमध्ये इतक्या छान तऱ्हेने सर्व उद्योजकांचा इतिहास समजावून दिला होता कि मला तो इतिहास तुमच्या बरोबर वाटून घ्यावा असे न वाटेल तरच नवल. खूप काही शिकण्यासारखे होते. न्यूयॉर्कमध्ये रहात असल्याने कितीतरी वेळा ग्रँड सेन्ट्रलला जाउन आलोय.