Skip to main content

लेख

त्रास

लेखक शिरीष फडके यांनी मंगळवार, 18/11/2014 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
कलमनामा – १२/१०/२०१४ – लेख ७ - त्रास त्रास २५ माळ्यांची इमारत. आठवड्यासाठी या इमारतीमधील लिफ्ट बंद. कारण नवीन लिफ्ट बसवण्याचा निर्णय सोसायटीने घेतलेला आहे. बरं, पर्यायी लिफ्ट किंवा पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे सगळ्या फ्लॅटधारकांची, आठवड्यापुरती का होईना गैरसोय होणार आहे. आपण आता २५व्या माळ्यावर राहणार्या चार घरांमधील एक-एक प्रतिनिधिची या आठवड्यातील (म्हणजेच ज्या आठवड्यात लिफ्ट बंद होती किंवा नवीन लिफ्ट बसवण्याचं काम सुरू होतं) प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. प्रत्येक व्यक्ती रोज अनेकदा अनेक कारणांसाठी पायर्यांवरील प्रवास करत होती.

कोवळा हुंकार

लेखक समयांत यांनी सोमवार, 17/11/2014 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी सकाळी तुला आठवतांना माझ्या घट्ट मिटल्या पापण्यांतून ओघळून जाऊ नयेस तू कोवळा हुंकार देऊन आपलंस करावं अलगद जीव गुंतवत जीवन उलगडावं दोन ठोकर खात मला माझं संपवावं रात्र बेरात्र फुललेल्या जाईजुईत हुंडदावं नकोशी घागर डोक्यावर घेऊन नाचावं प्राणपणाशी रोज पोरकट प्रेम भिजवावं वरच्या तीन ओळी तुटक आहेत तरी माझ्या तुटलेल्या रेषा व्यक्त करू शकत नाहीत. कुठे आणि कुठवर जातो आहोत आपण, हा मानसिक प्रश्न मला सतावतो आहे. जवळ रक्ताच्या माणसांनी यातना खूप दिल्यात.

शिक्षण

लेखक शिरीष फडके यांनी सोमवार, 17/11/2014 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षण लहानपणी त्यांचा मुलगा काही केल्या शाळेत जायला तयार होईना. तो सतत नकार द्यायचा. अनेक प्रकारे वडिलांनी त्याला समजावलं पण तो काही केल्या ऐकेनाच. त्या मुलाचं म्हणणं होतं शाळेत अनेक तासांत जो माझा अभ्यास होतो तो मी घरी राहून काही वेळेतच करू शकतो. मग मी शाळेत का जाऊ? वडिलांनी मुलाला बरंच समजावलं. एक वेळ ओरडलेदेखील पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग वडिलांनी बराच विचार केला आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. एक प्रकारची जणू काही मुलाला त्याचं म्हणणं पटवून देण्याची संधी ते त्याला देत होते. त्यांनी मुलाला सांगितलं तू काही दिवस घरी बसून अभ्यास कर.

प्रतिमा

लेखक शिरीष फडके यांनी रविवार, 16/11/2014 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिमा दुपारची वेळ. घरात आई आणि मुलगी अशा दोघीच. मुलीला झोपवल्यावर आईदेखील थोडावेळ तिच्या शेजारीच पहुडते. काही वेळाने मध्येच मुलीला जाग येते. काय आणि कसं सुचतं कुणास ठाऊक पण तिला आईप्रमाणेच स्वयंपाकघरात जाऊन काम करण्याची लहर येते. ती ठरवते आपणसुद्धा आईप्रमाणेच भाजी चिरूया. ती रोज आईला भाजी चिरताना बघतच असते आणि अगदी तसंच आपणसुद्धा भाजी चिरून आईला थोडी मदत करावी असं तिला वाटतं. पण सुरी कशी घ्यायची कारण ती तर ओट्यावर आहे आणि तिची उंची तिथपर्यंत पोहोचणार नाही. मग ती बाहेरच्या खोलीतून एक खुर्ची हळूहळू (आवाज न करता) स्वयंपाकघरात ओढत आणते. खुर्चीवर चढून ती ओट्यावरील सुरी आधी घेते.

स्वीकार

लेखक शिरीष फडके यांनी शनिवार, 15/11/2014 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
स्वीकार तसं ४०-५० उंबरठ्यांचं गाव. फार मोठंही नाही आणि नावाजलेलंही नाही. आज गावासाठी आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या गावातील एक मुलगा शहरात जाऊन रितसर शिक्षण घेऊन गावात परत येणार आहे. गावातील तो पहिलाच मुलगा आहे जो शहरात एवढं शिक्षण घेऊन गावात परतणार आहे आणि त्यामुळे गावाला त्या मुलाचं फार कौतुक वाटतंय. गावातील वृद्ध व्यक्तिंना बर्याच वर्षांपूर्वीची गावभर दुडूदुडू धावणारी त्या मुलाची लहान पावलं आठवत आहेत. आईवडिलांना आणि भावा-बहिणींना तर आज अभिमान वाटावा असं काही घडणार आहे. ज्याची गाव उत्सुकतेने वाट पाहत होतं त्या मुलाचं गावात आगमन होतं. पण आता तो लहान राहिला नसून तरुण झालाय. कोण आनंद होतो गावाला.

एक अडनिड गावाची गोष्ट... १

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 14/11/2014 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा आहे का? नाही ही कथा नाही, पण जे काही घडले होते ते एखाद्या कथेतीलच असते. तर किती बरं झाले असते. असं झाले असते, तसे झाले असते असे म्हणून आता काय उपयोग! जे घडायला नको होते ते घडले होते. देवासारखी माणसं शैतानागत वागली म्हणायची की भूताने झपाटली म्हणून तशी वागली ते त्या बिरोबालाच ठाऊक. पण जे काही घडलं भयंकर होते, असे कधी घडेल आणि त्या पापाची फळे अशी येथेच भोगावी लागतील, याची किंचित जरी कोणाच्या मनात शंका आली असती, तरी हा अनर्थ टळला असता. पण... दूरवर पसरलेलं जंगल, उत्तरेकडे आई-बापाचे दोन डोंगर, आणि त्या दोन डोंगराच्या कुशीत वसलेले, लहानसं, पण तसे संपन्न असलेले गावं!

मातृत्व

लेखक शिरीष फडके यांनी शुक्रवार, 14/11/2014 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
मातृत्व मातृत्वाचा एवढा उदो उदो करू नये ज्यामुळे एक दिवस मातृत्वच मातृत्वाला मारक ठरेल. अनेकदा हे वाक्य अनेक लेखकांच्या लिखाणातून किंवा कवींच्या काव्यसंग्रहातून आपल्यासमोर येतं. परंतु आजही या २१व्या शतकात या वाक्याचं गांभीर्य समाजाने लक्षात घेतलं आहे असं आढळून येत नाही. मातृत्व म्हणजे केवळ आई होणं का? आई होणं आणि मूल होणं या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? मातृत्वाचं आणि पितृत्वाचं समाजातील स्थान, महत्त्व समान आहे का? मातृत्व म्हणजे नक्की काय? मातृत्वाचा उदो उदो म्हणजे नेमकं काय? मातृत्वाबद्दलचे समज आणि गैरसमज कोणते?

एकटेपणा

लेखक शिरीष फडके यांनी गुरुवार, 13/11/2014 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकटेपणा आपल्या आयुष्यात, आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. काही संस्कार, परंपरा यातून काही अंगवळणी पडलेल्या असतात. अशाच गोष्टी, प्रसंग यांचा अन्वयार्थ शोधणारं हे नवं सदर… आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा… एक चित्रकार. तसा तो या कलेच्या क्षेत्रात नवीनच. फारसं नाव नसलेला किंवा या क्षेत्रापुरतं म्हणायचंच झालं तर अनोळखी. या चित्रकाराचं एक स्वप्न होतं, ते स्वप्न म्हणजे त्याला आवडणार्या एका सुंदर व्यक्तिचं रूपचित्र (Portrait) काढणं. अर्थात त्याकाळी ती व्यक्ती प्रसिद्धीच्या उंच शिखरावर विराजमान असल्यामुळे आपलं स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होईल की नाही याबद्दल त्याला स्वतःलाच थोडी शंका होती.

पाठलाग..

लेखक बोबो यांनी बुधवार, 12/11/2014 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
पाठलाग.. ***************************************************** बराच वेळ आम्हा दोघांपैकी कुणीही एकसुद्धा शब्द बोललं नाही. दोघेही शांत,चिडीचूप. पण मग मलाच राहवेना. विचारू की नको असा विचार मी करत होतो. कारण निर्णय मनाविरुद्ध गेला तर मी ते कसं पचवणार याची भीती वाटत होती. या आधीचा माझा एक अनुभव अतिशय वाईट होता. त्या अनुभवानंतर आलेल्या डिप्रेशनमधून मोठ्या मुश्किलीने मी स्वतःला सावरलं होतं. आणि आता पुन्हा एकदा विषाची परीक्षा घ्यायची वेळ आली होती. मनाशी देवाचा धावा केला. म्हटलं,"देवा महाराजा, या वेळेस सुद्धा जर निर्णय माझ्या मनासारखा लागला नाही तर ते सहन करण्याची शक्ती मला दे.

घालीन लोटांगण

लेखक शिरीष फडके यांनी बुधवार, 12/11/2014 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
कलमनामा – ३१/०८/२०१४ – लेख १ - घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदीनं चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा ही आरती गणपतीच्या दिवसात नेहमीच ऐकली जाते, म्हटली जाते किंवा गायली जाते. ही आरती बर्याच जणांची आवडती आरती आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. इतर आरत्यांपेक्षा ही आरती जरा वेगळी आहे म्हणून काहींना आवडते तर काहींना या आरतीची चाल गतिमान आहे म्हणूनदेखील ही आरती आवडते. (तसंच या आरतीला वाजवल्या जाणार्या टाळ्यांमध्येदेखील एक विशिष्ट गती आहे).