Skip to main content

लेख

सुर्याची लेकरे

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 22/07/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यात महाभारताशी संबंधित काही लेख वाचत होतो. जाणकारांमध्ये महाभारत कालासंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की महाभारताचे युद्ध ऑक्टोबर महिन्यात घडले. (त्यावेळेस ख्रिस्ती कालगणना अस्तित्वात नव्हती पण लोकांना नीट समजावे म्हणुन ऑक्टोबर लिहिण्याची पद्धत आहे.) महाभारत मुळात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात. पण बाकीच्या तारखांबद्दल एकुणात गोंधळच आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट इतक्यात वाचली की कृष्णाचा जन्म २७ जुलैचा. ही तारीख काढण्यामागची अनेक कारणे त्या लेखात दिली होती. मला त्यात फारसा रस नव्हता पण तो लेख वाचता वाचता महाभारतावर एक लेख लिहायचा विचार पक्का केला.

परीकथेचे सव्वा वर्ष .. (facebook status)

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 19/07/2015 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण सव्वा वर्षांपूर्वी मी मिपावर माझ्या मुलीच्या (परीच्या) जन्माची कहाणी लिहिली होती. तेव्हा येणार्‍या काळात तिच्या छोट्यामोठ्या आठवणी लिहून काढायच्या असे मनाशी ठरवले होते. पण हल्ली आठवणींची साठवण फोटो आणि विडीओमध्येच सोयीस्कर पडत असल्याने अगदी तसेच काही झाले नाही. पण फेसबूक स्टेटसच्या निमित्ताने मात्र काही आठवणी कागदावर उतरल्या. काल सहज त्या पहिल्यापासून वाचतानाही गेल्या वर्षभराच्या आठवणी ताज्या झाल्या. आणि म्हणूनच त्या संकलित करून ब्लॉगवर ठेवायचे ठरवले.

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

लेखक राजघराणं यांनी शनिवार, 18/07/2015 02:16 या दिवशी प्रकाशित केले.

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही - तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे. हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म विषयक मते या लेखात पाहूया .

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … ३ (अंतिम )

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 16/07/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ (अंतिम ) भाग १ भाग २ २०१५ आज ३२ वर्षानंतरही संस्था वाढवण्याची स्पर्धा कमी होत नाही. कापड गल्लीत अजून एक कापडाचं दुकान चालतंच ! किंवा अजून थोडं वेगळं उदाहरण. एखाद्या मंदिरात जत्रेनिमित्य लाखोंची गर्दी होणार, आणि येणारा प्रत्येकजण एक प्रसादाचा नारळ घेणार असेल तर नारळाची भरपूर दुकाने निघणारच. काहीजण चार दुकाने टाकणार तर कुणी फक्त भांडवल टाकून दुकान दुसऱ्याला चालवायला देणार. विशिष्ठ लोकेशनच्य दुकानाचे अन ओरडणाऱ्याचे जास्त नारळ खपणार.

शतशब्द कथा - सुट्टी

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 16/07/2015 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
“अगं, मांढरे बाई आजपासून एक आठवड्याच्या सुट्टीवर आहेत. तुही येणार नाही असे चक्क फोनवर सांगतेस. प्ले स्कूलमध्ये लहान मुले आहेत. त्याना कोण सांभाळणार?” “बाई, आई आजारी आहे, तिचे मलाच बघावे लागते. तिला अंथरुणातून बाहेर तर पडूदे. तीन चार दिवस तर मी हलुच शकणार नाही. कर्मचाऱ्यांच्या रोजच्या नाटकांनी इरावती वैतागली होती. तिने नुकतेच काढलेले प्ले स्कूल. कशीबशी मुले यायला लागलेली. त्यांच्याकडे निट लक्ष पुरविले नाही तर मोठा घोळ! काय करायचे? आठवडा तरी ढकलायला हवा. इरावतीने भराभरा पालकांना फोन केले. “आय एम सॉरी, पण उद्यापासून आठ दिवस मुलांना शाळेत पाठवू नका प्लीज. एका मुलाला चिकुन गुन्या झालेला आहे.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 14/07/2015 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ २००० मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी तंत्रशिक्षणाचा हळूहळू दर्जा खालावत गेला. पण सगळं वाईटच आहे का? तर नाही. म्हणजे बऱ्याच अंशी चांगल्या संस्थांची गरज होती. पण चांगल्या चार- पाच आणि वाईट पन्नास असं झाल्यानं हे सगळे क्षेत्रच वाईट असा समज झाला. काय निवडावं लोकांना कळेनासं झालं. गावातलं कॉलेज - राहायचा खर्च नको व्हायला म्हणून जवळ प्रवेश घेतला तर स्पर्धेत मागे पडतो आणि पुण्यात जाउन घ्यावं तर अतिसुमार ठिकाणी मिळते आणि हे नंतर कळते! अशा पेचात ग्रामीण भागातली मुलं फ़सतात.

लिव बामणां लिव

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 14/07/2015 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मावसभावाच्या, कोकणात,आंब्यांच्या बागा आहेत.देवगडहून हापूस आंब्यांची कलमं आणून त्याने आपल्या बागेत रुजवली होती.आता त्या झाडांना भरपूर आंबे लागतात.जर मी कोकणात त्या मोसमात गेलो नाही तर तो मला एक आंब्याची पेटी मुंबईला पाठवून देतो. ह्या देवगड आंब्यांची खासियत आहे.मध्यम आकाराच्या ह्या आंब्याला तो चांगला पिकला आणि खाण्यालायक झाला हे त्याच्या सालीला सुरकत्या आल्या की समजावं.वास तर भरपूर येतो.हा आंबा छोट्या चाकूने कापायला मजा येते.सालीच्या आतमधे सगळाच गर असतो.आतला बाठा एकदम लहान असतो.एक शीर कापून गर तोंडात टाकल्यावर त्याची चव एव्हडी मधूर असते की,ठेवणीतला मध चमच्याने बाटलीतून काढून जीभेवर सोडल्

कांदे-पोहे.

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 13/07/2015 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील कुठ्ल्याही शहरातील उपहार गृहात गेला, तर महाराष्ट्रीयन कोणताही पदार्थ कमी प्रमाणात मिळेल.त्या मानाने उत्तरे कडून आलेले सामोसे,छोले भटोरे,कचोरी किंव्हा दक्षिणे कडील इडली,डोसा,उताप्पा वगैरे हे पदार्थ सहज उपलब्ध होतील. थोडक्यात आटके पार झेंडा लावलेल्या, महाराष्ट्रातील पराक्रमी पुरुषांची अनेक किस्से, आपणाला नावा सहित सांगता येतील, मात्र महाराष्ट्राचे इतर वेळी खाण्याचे स्पेशल पदार्थ म्हणावे तितके सांगता येणार नाहीत कींव्हा सहज उपलब्ध होणार नाहित.इतर वेळी खाण्यासाठी आसणारे महाराष्ट्रीयन पदार्थ फ़ारच कमी आहेत क़िव्हा काळाच्या ओघात ते आपण सोडून दिले असणार .