Skip to main content

लेख

एका अनोळखी प्रदेशात - २

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 27/09/2015 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार पसरत चाललाय. निटसं दिसतही नाहीये. आणि मी फाट्यावर ऊभा ठाकलोय. एकटाच. हातातल्या बँगेत भुर्जीपावचं पार्सल घेऊन. एव्हाना त्या टपरीवल्याला काहीतरी बिनसल्याची चाहुल लागली.

स्क्रिन शॉट भाग -४

लेखक राजू यांनी शनिवार, 26/09/2015 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत ..... मेहुणी " अहो हे काय तूमचे नाव मला 'People You May Know' मध्ये तुमचे नाव आणि प्रोफाईल पिक्चर दिसत आहे.अहो थांबा इथे तर तुमचे ३-४ सेम टु सेम नावे आणि फोटो दिसत आहेत." झाले अमितच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि त्यासोबत अमितही डोक्याला हात लावून खाली बसला.... त्याच्या तोंडातून बाहेर आलेले शब्द होते... "अरे बापरे !!! आता हे काय नविन लफडे आहे." पुढे चालु.....
स्क्रिन शॉट भाग -४ पुढे चालू ह्या मेसेज,स्क्रिन शॉट, नंतर सेम टू सेम प्रोफाइल्सने अमित साठी आजचा दिवस या वेळे पर्यंत तरी एका मागोमाग एक धक्के देणाऱ्या भूकंपाचा ठरला होता.

कोकणातली फुलं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 26/09/2015 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
“फूलं माणसाचं व्यक्तित्व उत्साहित करतात,शिवाय जीवनात आनंद आणतात.म्हणूच मला फुलांविषयी विशेष वाटतं.”---अरूण अरूणला फुलांविषयी विशेष वाटतं हे मला माहित होतं.त्यादिवशी असाच फुलांवरून विषय निघाला. त्याला मी म्हणालो तुला फुलं आणि फुलांचे प्रकार पहायचे असतील तर ह्या वेळी तू माझ्या बरोबर कोकणात ये.अरूणने कोकण कधीच पाहिलं नव्हतं.मुंबईला जन्माला आला आणि मोठा झाला. “आमची -सिकेपी लोकांची-वसाहत फारफारतर ठाण्यापर्यंत पसरली आहे.एकवीरा आमची देवी.

एका अनोळखी प्रदेशात

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 26/09/2015 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास चार वाजता एस. टी. भेटली. मधल्या शिटावर बसुन माझा प्रवास सुरू झाला. खिडकीतुन बाहेर बघत बसलो. कंटाळा आला. हेडफोन कानात घालुन मस्त ताणुन दिली. "फुल मांगुना बहार मांगु......" वाह! काय मस्त गाणं आहे अगदी तिनचं गायल्यासारखं. गाडीने वेग घेतला. हायवेवरचा वेग. तुफान. तासाभरानं एक गाव आलं. तिथ उतरायचचं होतं. कसलं हे गाव 'थिरडी'. अजुन इथनं आठ-दहा किलोमीटर लांब होतं म्हणे. एकतर संध्याकाळची वेळ. तिथं काही खायला भेटणं अवघडचं. एका गाड्यावर भुर्जी-पाव हाणली, डब्बल. एक पार्सल पण घेतली. मग टमटमनं निघालो 'थिरडी' कडं. महामार्गापासुन आत जाणारा गावठी रस्ता आता सुरु झाला.

पाश - कथा - भाग १

लेखक सिरुसेरि यांनी शुक्रवार, 25/09/2015 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
"जन्या , ए जन्या , आरं ती रीळं आली का न्हाई अजुन ?" राजाभाउ आपल्या मदतनीसावर खेकसले . "न्हाई मालक . सदू गेलाय तालुक्याच्या गावाला , पन अजुन आला न्हाई" जन्याने उत्तर दिले . राजाभाउ चिंतेत पडले . त्यांचा फिरत्या टूरींग टॉकीजचा व्यवसाय होता. खेडेगावांमध्ये जत्रेच्या दिवसांमध्ये मोकळी जागा पाहुन ओपन एअर तंबु ठोकायचा आणी रात्री चित्रपटांचे खेळ दाखवायचे असे या व्यवसायाचे स्वरुप होते . चार बाजुंनी कापडाच्या भिंती , आतमध्ये एका टोकाला सिनेमाचा पडदा आणी दुसरया टोकाला प्रोजेक्टर . मधे प्रेक्षकांसाठी बसायला मोकळी जागा. त्यातही एक बाजु स्त्री प्रेक्षकांसाठी आणी दुसरी बाजु पुरुष प्रेक्षकांसाठी .

स्क्रिन शॉट भाग - ३

लेखक राजू यांनी शुक्रवार, 25/09/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत .... १) त्याचे अकाउंट कोणीतरी हॅक केले होते.२)कोणालातरी त्याचा पासवर्ड माहीत झाला आणि त्याने हे केले आहे.३)कसलातरी वायरस आहे ज्याने असे मेसेज फॉरवर्ड झाले.४) किंवा असे काहितरी घडले आहे जे सध्या तरी आपल्या आकलना पलीकडे आहे.

राग राजस्थानी

लेखक अद्द्या यांनी गुरुवार, 24/09/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
लोक किती काही म्हणोत . कि बाहेर राहून आल्यावर फक्त घरचंच जेवण चांगलं लागतं किंवा आईच्या हातचा वरण भात किंवा बाबांच्या हातचा तिखट जाळ झुणका. या सगळ्याची किंमत जरी बाहेर राहिल्यावर समजते . तरीही , घर सोडून दुसऱ्या गावात राहायला गेलं कि एक कला आपल्याआपण शिकतो . ती म्हणजे चांगली खायची ठिकाणे शोधणे. मग तो साधा भेळपुरी वाला असो कि भवानी मंडपातला तोंडाला पाणी सुटेल असा तांबडा पांढरा रस्सा असो . किंवा भल्या सकाळी ७ वाजता कटाकिर्र मध्ये जाऊन हाणलेली मिसळ असो . किंवा रात्रीच्या शांत वातावरणात पद्मा गेस्ट हाउस सामोरील "चाचा" ची गरमागरम चाय असो .

काहीतरी करण्याची जिद्द

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 24/09/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
जिद्द, आत्मविश्वास या गोष्टी शोधायच्या असतील तर थोरांची आत्मचरित्रच वाचावी लागतात, त्यांचे शब्द ऐकावे लागतात असं नाही. अगदी साध्या सोप्या माणसांशी केलेल्या संवादातूनही अशा मूल्यांची ओळख होते. असाच एक माणूस मला भेटला. हा माणूस म्हणजे आमच्या कँटीन स्टाफ मधला एक जण. अगदी ४-५ महिनेच झाले असतील त्याला कँटीन मधे लागून. इथे एका केटरर चं कंत्राट आहे, ज्याच्याकडे हा कामावर आहे. तसेही कँटीनमधले चेहरे नियमितपणे बदलत असतात त्यामुळे सुरुवातीला 'आणखी एक नवीन चेहरा' म्हणून त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही कुणी आणि मीही.

स्क्रिन शॉट भाग -२

लेखक राजू यांनी बुधवार, 23/09/2015 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
स्क्रिन शॉट भाग - २ आतापर्यंत..... असभ्य भाषेतील वेगवेगळ्या प्रकारचे मेसेंजर वरील मेसेजचे स्क्रिन शॉट पाहुन........छातीत आलेली कळ,धूसर झालेली नजर आणि फुटलेल्या घामाने हार्ट अटॅक आल्यावर जशी अवस्था होते तशी त्याची अवस्था झाली. पुढे चालु..... नखशिखांत हादरलेला अमित आता त्या बसलेल्या धक्क्यातून सावरु लागला. जसजसे मन आणि बुध्दी स्थिर होऊ लागली तसे त्याने सर्वप्रथम आपले फेसबुक अकाऊंट लॉगआउट करुन नेमके काय घडले असू शकते याच्या विचारात गुंतवले. काल रात्रीच अमित व त्याचे काही मित्र एका पोस्टवर कॉमेंट्स मध्ये हँसी मजाकची मस्ती करत होते.