Skip to main content

लेख

स्वरांजली

लेखक मिडास यांनी सोमवार, 27/03/2017 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट आणि रात्र या मधली वेळ. कशी कुणास ठाऊक आज अश्या अवेळी जाग आली तिला. कूस बदलून पाहते ती, पण निद्रादेवी काही प्रसन्न होत नाही. झोपडीचं दार उघडून ती बाहेर येते. आकाशात तारे मंद चमचमत आहेत. पहाटेच्या वाऱ्याने तिच्या अंगावर शहारा येतो. पदर गच्च आवळून घेत ती चालू लागते. कुठे जायचंय ठाऊक नाही पण ती चालू लागते. पहाटेच्या दवात भिजलेली मऊशार माती तिच्या पायाला पावलागणिक माखतेय. कसलास धुंद सुवास पसरलाय चहूकडे. त्या सुवासाने तिची आठवण जरा चाळवते. चंदनाचा सुवास. तिच्या मनात भरलाय तो वास. आठवणींच्या कपाटात ती धुंडाळतेय काहीतरी. आणि अचानक गवसते तिला ती नेमकी स्मृती.

त्यांना हे जमत कसं..?

लेखक Pradeep Phule यांनी सोमवार, 27/03/2017 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरचा माझा हा पहिला लेख. पण विषय कोणता निवडावा हा यक्षप्रश्न माझ्यासमोर आं वासून उभा होता. कारण मिपावर सर्व विषयांवर भरपूर प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. शेवटी विषय मिळालाच. ज्यांच्या कविता वाचून मी मोठा झालो, त्यांनाच निवडावं असं ठरवलं. यांच्या शिवाय मराठी साहित्य संस्कृती अपूर्ण आहे, असं म्हंटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्या म्हणजे "बहिणाबाई चौधरी". लिहायला सुरवात तर केली, पण शब्द मात्र ययातीतल्या अलका सारखे गट्टी फु करून बसलेत. माझं प्रत्येक वेळी असचं होतं, कोरा कागद समोर आला कि डोकं कसं अगदी बधिर होऊन जातं. आणि त्यांच्या बद्दल मी काय लिहावं. त्या म्हणजे शब्दांच्या पलीकडे आहेत.

रावणमामा

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 24/03/2017 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
रावणमामा रावण नावाभोवती अनुकूल प्रतिकूल अर्थाच्या वलयांनी एक अभेद्य भिंत शेकडोवर्षापासून उभी केली आहे. संदेहाच्या प्रतलावरून प्रवाहित असणारे हे नाव कधी होकाराचा, तर कधी नकाराचा आशय घेऊन संस्कृतीच्या पात्रातून वाहते आहे. काहींना या नावात नकाराच्या सुस्पष्ट रेषा दिसतात, तर काहींना विद्वत्तेची वलये. शेकडो वर्षे उलटूनही त्याभोवती असणारे संदेहाचे धुके काही विरळ होत नसल्याने नकार-होकाराच्या कृष्णधवल छटांमध्ये ते आपला चेहरा शोधते आहे. म्हणूनच असेल की काय, या नावाला आपलं अभिधान म्हणून मिरवणारे आसपास अपवादानेच आढळतात. राम नाव धारण करून अभिमानाने मिरवणारे लाखोने आहेत.

दांडी मारणे - एक विलक्षण कला

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 24/03/2017 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

डाव!!!

लेखक विद्या चिकणे मांढरे यांनी बुधवार, 22/03/2017 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
'आज स्वाती आणि गौरवच्या घरातून खुपचं आवाज येतोय, नाही?', डोळे किलकिले करत स्वातीच्या बाल्कनीकडे बघत जोशीकाकू बोलल्या. पेपरात खुपसलेलं डोकं आणखीनच खुपसंत काका फक्त 'हुं' एवढंच म्हणाले. 'अहो नेहमीपेक्षा जास्त वाटतंय आज', नं रहावुन त्या परत बोलल्या. 'तुझं आपलं काहीतरीच असतं मला पेपर वाचू देत बऱ', पेपरचं पान बदलत काका म्हणाले. 'थांबा मी बेडरुमच्या खिडकीतून काही कळतंय का बघते.' असे म्हणत काकू बेडरूम कडे धावल्या. 'तुला फार चौकशा लागतात, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तू नको नाक खुपसू त्यात,' काका बोलले. पण काकूंनी लक्षच नाही दिलं.

ती...

लेखक प्रफुल्ल यांनी मंगळवार, 21/03/2017 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्याचा खुर्दा पडला होता, कधी एकदा २-३ पॅक मारतो असं झालं होत. बिअर बार मध्ये गेलो, बिअर बार कसला सालं बेवडयांची सोय व्हावी म्हणून काहीतरी बांधून ठेवलं होते हेवशीर होत एवढच काय ते चांगलं. एक कोपरा पकडून बसलो तेंव्हा ती दिसली एका खिडकी जवळ बसली होती, लक्ष गेले कि डोळ्यात डोळे घालून बघायची, डोळ्यांमध्ये आतुरता होती. मनात विचार आला का आली असेल इथे, एक पेग झाला तरी ती काय जागेवरून हलली नाही. एकटक माझ्या कडेच बघत होती , माझे ३ पेग संपले काय माहित मला चढली होती कि काय पण तिच्या डोळ्यात आता जास्तच आरव दिसत होती. मी माझे बिल दिल आणि घरी निघालो डोक शांत झाले होते.

गौराक्का!!!

लेखक विद्या चिकणे मांढरे यांनी सोमवार, 20/03/2017 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
''गौराक्का, गौराक्का", राजूच्या हाकेकडे दुर्लक्ष करत, तिने हातातल्या दगडावरची पकड घट्ट केली आणि सर्वात उंच असलेल्या चिंचेवर नेम धरला. एक, दोन, तीन....म्हणत दगड भिरकावणार, इतक्यात आतापर्यंत अंगणात उभा राहून हाका मारणारा राजू जवळ आला होता. तिच्या हाताला धरून ओढंतच घराकडे नेऊ लागला. 'गौराक्का चल, काकूने बोलावलंय तुला लगेच.' 'थांब रे! ती चिंच पाडू दे, काय कटकट लावलीस, येते सांग आईला.' 'नाही काकूने लगेच बोलवलंय, चल.' राजूने धोशाच लावला. 'काकूचा चमचा कुठला, चल.' असे म्हणत नाईलाजाने तिने हातातला दगड खाली टाकला आणि राजूच्या खांद्यावर हात टाकून चालू लागली.

मुन्तजिर

लेखक मिडास यांनी सोमवार, 20/03/2017 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
राग, मत्सर, लोभ, द्वेष, अहंकार कुठल्याही नातेसंबंधात अपरिहार्यपणे येणारे हे भोग. कुणी कधी जिंकतं तर कधी कुणी हरल्याचं दाखवतं. पण साचत जातं काहीतरी आतल्या आत. घुसमट होते. तापलेल्या मनावर पुटं चढत जातात अपमानाची आणि मग कधीतरी कोंडलेली वाफ नको तिथे फुटते. पोळून निघतात मनं. मग रस्ते वेगळे होतात. दिवस जातात, वर्षं उलटतात. आणि मग एखाद्या नाजूक क्षणी जुनी पायवाट आठवते. भुरभुरणाऱ्या पावसात पसरणारा मातीचा गंध दाटून येतो छाती भरून. फिरून कुणाला तरी परत भेटावं अशी आस लागते. दूर आहे म्हणून काय झालं, शेवटी कुठलातरी चिवट बंध रेंगाळतोच मागे. त्याच रेशमी धाग्याला पकडून कुणीतरी साद घालतं.

पण, लक्षात कोण घेतो!!!

लेखक विद्या चिकणे मांढरे यांनी शुक्रवार, 17/03/2017 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
परवा ऑफिसला जाताना बालगंधर्वच्या चौकात आले अन सिग्नल लाल झाला, म्हणून मग गाडी बंद करून सिग्नल पुन्हा हिरवा होण्याची वाट बघत उभी राहिले. तेव्हढ्यात साधारण अठरा-एकोणीस वर्षांची मुलगी गर्दीतून वाट काढत, सिग्नलवर थांबलेल्या काही निवडक लोकांना भेटून त्यांच्याशी काहीतरी बोलून त्यांना हातातल्या पुड्यातून एक-एक चॉकलेट काढून देताना दिसली. माझ्यासकट सगळेच 'ती नक्की काय बोलतीये आणि चॉकलेट्स का वाटतीये' या उत्सुकतेने तिच्याकडे बघत होते.

कथा आणि व्यथा बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....

लेखक परशु सोंडगे यांनी शुक्रवार, 17/03/2017 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!! चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची . "सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा. थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? " धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ." रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला.