Skip to main content

लेख

मी, माझी बायको आणि बायकोच्या ३ सवती

लेखक OBAMA80 यांनी शुक्रवार, 05/05/2017 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी, माझी बायको आणि बायकोच्या ३ सवती ------------------------------------------------------------------------------ काहीही हं… भाऊजी!!! करमणूक या नावाखाली असली काही नावे निवडली की आपण वाचकांची करमणूक करतो आहोत असे वाटते का तुला?? इश्श... भाऊजी, तुम्ही पण??? या काय गोष्टी आहेत का, चार लोकांत बोलण्या आणि लिहिण्याच्या. हे विषय घरातल्या घरात मिटवायचे असतात. माझ्या या लेखाचे शीर्षक वाचून, सज्जन व्यक्तिमत्व म्हणून मला जवळून ओळखणारे नक्कीच अशा काही टिप्पणी करतील.

मेंदू, भावना व वर्तणूक (२)

लेखक मंजूताई यांनी शुक्रवार, 05/05/2017 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
आधी म्टहल्याप्रमाणे आपला मेंदू एक सामाजिक संस्था आहे. प्रत्येक सेल्सची जागा ठरलेली आहे, अचूक कामाची विभागणी, कामाच्या स्वरूपानुरूप कर्मचाऱ्यांची संख्या असते. गंमत म्हणजे त्यांच्यात ना स्पर्धा असते ना भांडणं ! निमूटपणे आपआपलं स्वशिस्तीत काम करत असतात. असा हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव ‘मेंदू’ म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. अमेरिकन न्युरॉलॉजिस्ट ऑलीव्हर सॅक्स ह्यांनी ‘न्युरॉलॉजी ऑफ आयडेंटिटी’ संकल्पना मांडली आहे. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत व त्या पुस्तकांवरून सिनेमेही बनवल्या गेलेत.

जीवाशी खेळ

लेखक परशुराम सोंडगे यांनी मंगळवार, 02/05/2017 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा . . . . . . . जीवाशी खेळ पहाटं पहाटं नगर गाठलं.जिपडं हास्पीटलच्या दारातचं उभं केलं. शिव्या खाली उतरला .मागं गेला .पल्लीला उचल्लं.तशी ती मोठयांन विव्हळली. तो तिला घेऊन पाय-यावर आला.तिथचं टेकवली .टेकल्याबरूबर ती लगेच कलांडली.तिचा पार आकडा झाला होता.पारचं गळाटून गेली होती.त्याची सासू सारं बोचक घेऊन माग आली. पल्लीच्या त्वांडावर हात फिरवला .तशी पल्ली विव्हाळली,"आयो मेले गं..!!" ड्रायव्हर विलाश्यानं पुढी काढली.ते काय करील दुसऱ...? तसचं धाबाड उचाकलं नि त्यात सोडली अन् पायरीवर टेकला . बसलं पचापचा थुकतं. कचाकचा पाय-यावर चढून तो पार वर आला दुस-या मजल्यावर आला.

ग्रीष्माच्या कविता....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 02/05/2017 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रीष्माच्या कविता... तपता अंबर, तपती धरती, तपता रे जगती का कण-कण! त्रस्त विरल सूखे खेतों पर बरस रही है ज्वाला भारी, चक्रवात, लू गरम-गरम से झुलस रही है क्यारी-क्यारी, चमक रहा सविता के फैले प्रकाश से व्योम-अवनि-आँगन! डॉ. महेंद्र भटनागर... या जगातील आद्य कवि असे नक्की कुणाला म्हणता येईल देवच जाणे. पण ज्याने कोणी पहिली कविता लिहीली असेल त्याचे खरोखर प्रचंड उपकार मानले पाहिजेत. प्रसंग, घटना कितीही त्रासदायक असो तिचा दाह कमी करण्याची ताकद कवितेत आहे, असते. वरील कविताच पाहा ना. सरळ सरळ जर तापलेल्या रणरणत्या उन्हाने धरा तप्त झालेली आहे. शेते सुकून चालली आहेत.

तोड पिंजरा, उड पाखरा

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 02/05/2017 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
गेला एक तास या आडरस्त्यावर त्यांची गाडी चालली होती. "साहेब पत्ता बरोबर आहे ना ?" ड्रायव्हर हरिहरने विचारलं. "हो रे, हाच रस्ता सांगितलाय." आदित्य म्हणाला खरा पण मनातून त्यालाही खात्री नव्हती. आपल्या अक्ख्या आयुष्याचाच रस्ता चुकलाय असं त्याला वाटून गेलं आणि तेवढ्यातच समोर सायोची स्कूटी रस्त्याच्या कडेला त्याला दिसली. आता पुढे रस्ता संपलाच होता. फक्त पायवाट होती. आदित्य आणि हरिहर पायवाटेवरून चालू लागले. पाच दहा मिनीटांत ते एका मोठ्ठया बैठ्या घरासमोर आले. ते ओसरीपर्यंत पोहोचतात तोच आतून एक  वयस्कर गृहस्थ बाहेर आले. "आम्ही सायो मॅडमना भेटायला आलोय" आदित्यने सांगितलं.

न्यूरेम्बर्ग - भाग ३

लेखक अफगाण जलेबी यांनी सोमवार, 01/05/2017 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूरेम्बर्ग - भाग २ न्यूरेम्बर्ग - भाग ३ २० नोव्हेंबर १९४५ या दिवशी खटल्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याआधी अनेक पडद्यामागच्या घडामोडी घडल्या. खटला सुरु होण्याच्या साधारण एक आठवडा आधी रशियन सरकारी वकील रुदेन्कोला मलेरिया झाल्याचा निरोप न्यायाधीशांना मिळाला. ब्रिटिश आणि अमेरिकन वकिलांचा आणि न्यायाधीशांचा अर्थातच याच्यावर विश्वास बसला नाही. ‘ हा राजनैतिक मलेरिया असावा ‘ असं मत ब्रिटिश परराष्ट्र खात्याने व्यक्त केलं. दुसरीकडे सर्व आरोपींच्या वकिलांनी या न्यायालयाच्या वैधतेला आव्हान देणारी एक याचिका दाखल केली.

तलाक

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/05/2017 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. सुधीर रा. देवरे ही पोस्ट केवळ उत्सुकता आणि जाणून घ्यावे या हेतूने लिहीत आहे. म्हणून या पोस्टचा अर्थ कोणी धार्मिक वा राजकीय या अंगाने घेऊन गैरसमज करून घेऊ नये ही विनंती. मी या विषयाकडे सामाजिक प्रबोधन म्हणून पाहतो. सगळ्याच धर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध या विचारधारेतून झालेले हे लिखाण आहे: परदेशात राहणार्‍या माझ्या एका उच्चशिक्षित मुस्लीम मित्राला विचारलं, ‘आजच्या काळात तोंडी तीन तलाक विषयी तुमचं मत काय आहे?’ मित्र म्हणाला, ‘आपण धार्मिक बाबींवर न बोललेलं बरं. आपण आरएसएस विचारांचे आहात का?’ त्याचे उत्तर ऐकून मी चपापलो.

स्मृती संचय (मेमरी)

लेखक मंजूताई यांनी सोमवार, 01/05/2017 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम तर्फे मैत्रेयीने(समुपदेशक) 'मेमरी' वर एक चर्चात्मक कार्यक्रम घेतला. मैत्रेयीने टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल वर्कमधून एमएसडब्ल्यू केले आहे. पौगंडावस्थेतील मुला व मुलींच, विवाहपूर्व व विवाहत्तोर जोडप्यांचं ती समुपदेशन करते. विचार करणे, शिकणे व स्मृती संचय ह्या तीन एकत्रित गोष्टीने मुलांची बुद्धिमत्ता ठरते. ‘घोका व ओका’ उत्तमतर्हेनने करतो, म्हणजेच ज्याचं पाठांतर चांगलं आहे पूर्वी त्याला हुशार म्हटलं जायचं! पण आज हा समज खोटा आहे.

मनाची मनोगते

लेखक चंद्रकांत यांनी बुधवार, 26/04/2017 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यातील कुणीही मी: तो आणि ती एक मात्रा, एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित केलेली वर्णमालेतील अक्षरे. पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो. कुण्या अज्ञाताने कधीकाळी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे अनपेक्षित हाती लागतात. काळाच्या उदरात सामावून पडद्याआड गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या निबीड अंधारातून कवडाशाचा हात धरून विसकटलेले प्रसंग, विखुरलेले संदर्भ चालत येतात आपल्यापर्यंत, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कोशात विरलेले अध्याय नव्याने वाचले जातात आणि आशयाच्या अथांग डोहात विहार करीत राहतात.

चुकणारी आई

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 25/04/2017 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
"तुम्ही दोघांनी जर पटपट खाल्लं तरच पार्कमधे जायचंय, नाहीतर नाही" तिने नेहेमीप्रमाणे मुलांनी लवकर खावं म्हणून सांगितलं. आर्यन आणि विहान वय वर्ष पाच आणि तीन, दोघांनी आईची धमकी कितपत गंभीर आहे याचा अंदाज घेतला. आर्यनने पहिला घास तोंडात टाकला आणि "आय डोन्ट लाईक डोसा" म्हणून तोंड वाकडं केलं. विहानने तर भरवलेला घास तोंडातून फू फू करून बाहेर काढला. "त्यांना नकोय तर जाऊदे ना कॉर्नफ्लेक्स खाऊ दे त्यांना" नवर्याचा एक्स्पर्ट ओपिनियन! तोही मुलांसमोरच! तिला सुचेना की आता आधी मुलांना ओरडावं की नवर्यावर चिडावं ! "आपल्या पोटातल्या गुड बॅक्टरीयासाठी आंबवलेले पदार्थ चांगले असतात.