Skip to main content

लेख

इंद्रायणीतून पहिल्यांदाच प्रवास

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 13/01/2024 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
Indrayani at CSMT पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं.

‘शताब्दी’ची कॉपी, पण….

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 17/12/2023 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
VB प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं.

दिव्यांग दिवसानिमित्त एका संस्थेची ओळख

लेखक मार्गी यांनी रविवार, 03/12/2023 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारामध्ये आपण मिळून आणू प्रकाश: "सप्तर्षी फाउंडेशन" ✪ "इंटीग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन" ✪ बौद्धिक अक्षम मुलाकडून मिळालेली प्रेरणा ✪ बेवारसांचे वारस आम्ही ✪ जोडीने जाऊ पुढे ✪ संवेदनशीलतेची क्षमता ✪ "आमच्यासाठी आम्ही एक दिवसही काढला नव्हता" ✪ एक दिवस संस्थेचीही गरज उरू नये सर्वांना नमस्कार. आज ३ डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दिवस. दिव्यांग ही तशी खूप व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये २१ प्रकारच्या दिव्यांग किंवा विविध प्रकारे विकलांग (differently abled) व्यक्तींचा समावेश होतो.

दिवाळी विशेष - ‘सागरी पक्ष्यां’चं संग्रहालय

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 11/11/2023 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
गोवा जवळ असूनही जाऊ-जाऊ करत राहतच होतं. गोव्यात नौदलाच्या हवाई शाखेचं संग्रहालय असल्याचं बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्यातच नौदलाच्या हवाई शाखेबद्दल आणि त्यातही विमानवाहू जहाजांबद्दल आकर्षण असल्यामुळं ते संग्रहालय पाहावं अशी खूप इच्छा होती.

देखणं चेन्नई सेंट्रल

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 13/10/2023 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
MGR Chennai Central पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते.

चंद्रामागे जाणारा व परत येणारा शुक्र बघण्याचा थरारक अनुभव

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 13/10/2023 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
✪ दिवसा झालेले चंद्र- शुक्राचे पिधान ✪ क्षणार्धात अदृश्य व थोड्या वेळाने परत दृश्यमान होणारा शुक्र! ✪ ध्यानाचा अनुभव- जणू पूर्ण अंधार आणि क्षणार्धात आलेला प्रकाश ✪ दिवसा उजेडीसुद्धा शुक्र बघता येतो ✪ आकाशातील आश्चर्ये आपल्याला विनम्र करतात सर्वांना नमस्कार. आपल्याला दिसणारं आकाश एक जादूचा पेटारा आहे! अंधा-या रात्री दिसणारं आकाश बघताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. अशाच एका अवाक् करणा-या अनुभवाबद्दल आपल्यासोबत शेअर करत आहे. हा अनुभव अगदी वेगळा होता कारण तो दिवसा आलेला होता! दिवसाच्या वेळी आपण चंद्र तर बघूच शकतो आणि सौर फिल्टर वापरून सौर डागसुद्धा बघू शकतो.

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध आणि IMEC चे भवितव्य!

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 12/10/2023 17:13 या दिवशी प्रकाशित केले.

७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.

डिमुलां कॅमिली (Desmoulins camillie)

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 09/10/2023 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! सध्या फ्रेंच राज्यक्रांतीवर पुस्तक लिहितोय. जगात घडून गेलेल्या अत्यंत महत्त्वाच्या या घटनेने आपण अचंबित होतो. त्या काळातील माणसे, त्यांचे राजकारण, त्यांची त्यांच्या तत्त्वांवरील निष्ठा हे वाचल्यास सध्याच्या राजकारण्यांशी त्यांची तुलना होणे अपरिहार्य आहे. असो. ती तुलना मी मनातल्या मनात रोज करतोच. पण त्या क्रांतीतील तीन चार व्यक्‍तिरेखा मला अत्यंत आवडतात कारण जेव्हा ती क्रांती रक्‍तरंजित झाली तेव्हा ते मोठ्या धैर्याने त्या दहशतीच्याविरुद्ध उभे राहिले. त्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे प्राणही गमावले... तो इतिहास खरोखरच विस्मयकारक आहे...

संगीत प्र(या)वास

लेखक कुमार जावडेकर यांनी बुधवार, 04/10/2023 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच एका मित्रासोबत कुठल्या तरी बुवांच्या गायनाला गेलो होतो. त्यांनी 'केदार'चा एक स्वनिर्मित प्रकार गायला. गायकाचं नाव 'खार'कर असल्यानं बहुधा त्याच्या रागाचं नाव 'झुब-केदार' असं असावं असं माझ्या उगाच मनात येऊन गेलं. पण अर्थात, मला ते मित्राला सांगायचं धारिष्ट्य झालं नाही. उगाच (त्याचं ते आडनाव नसलं तरी) तो माझ्यावर खार खायचा. माझी सांगितिक वाटचाल कशी झाली असं जर कुणी विचारलं तर त्यावर 'अगतिक' हेच उत्तर मला पटकन सुचतं. त्या प्रयासाचं 'प्रागतिक'शी (मात्रा जुळत नसल्या तरी) यमक जुळवायचा त्रास मात्र मला टाळावासा वाटतो. प्रथम, संगीत म्हटलं की सूर आले.