Skip to main content

लेख

एका रात्रीचा थरार

लेखक लाल गेंडा यांनी बुधवार, 11/10/2017 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
दिनेशने वडापावचा मोठ्ठा घास घेतला आणि समोर बसलेल्या दीनुकाकांकडे पाहिलं. साठीत पण म्हातारा चुणचुणीत होता. डोळ्यातलं तेज जरासं उतरल्यासारखं वाटत होतं पण खरं किती होत तेच जाणे. दिनेशला इथे येऊन दहाच दिवस झाले होते. या दहा दिवसांत दिनूकाकांनी त्याला नोकरीच्या सगळ्या खाचाखोचा समजवून दिल्या होत्या. त्यांचं अख्ख आयुष्य चौकीदारीत गेलं होतं. कोकण सुरू होतो घाटांनंतर तिथलं पहिलं गाव हे. एका बाजूला घनदाट जंगल, डोंगर, त्याच्या दर्या-खोऱ्या आणि दुसऱ्या बाजूला त्यातून वाहणारी ती छानशी सुबक पण छोटीशी नदी. दिनेशला पहिल्या फटक्यातच सगळं आवडलं होत.

बळी [शतशब्दकथा]

लेखक निओ यांनी रविवार, 08/10/2017 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
रणरणतं ऊन, तापलेला रस्ता. सामसूम सोसायटी. हा रस्त्याच्या कडेने चाललेला....उपाशीपोटी. काहीतरी खायला मिळेल या आशेवर. समोर एक मुलगी त्याच्याकडेच पाहत राहिलेली. हा बावरला. भलतीकडे आल्यासारखे वाटले. जवळच्या झाडाच्या आडोशाला गेला. कानोसा घेऊ लागला. अजून माणसं जमली. सारे रोखून त्याच्याकडे पाहत होते. कुजबुजत होते. हा घाबरला, अंग चोरू लागला. .................................. लोक जवळ आले. हा टकामका त्यांच्याकडे पाहत होता. त्याला समजायच्या आत दणादण् दणके त्याच्या अंगावर कोसळले. नजरेसमोर अंधारी आली. कळवळला. जमिनीवर गडाबडा लोळू लागला. दणके वाढले.

डंकर्क.... भाग ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 06/10/2017 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
पण त्या क्षणी तरी विजयमाला हिटलरच्या आर्देन्सच्या जंगलातून परजत येत असलेल्या चिलखती दलाच्या गळ्यात पडली होती.... पुढे चालू... Simple, Free Image and File Hosting at MediaFire अर्देन्सच्या जंगलात फ्रान्सच्या ९व्या आर्मीमागे या सेना स्वैर संचार करून त्यांना हैराण करत होत्या. फ्रान्सच्या सैन्यात गोंधळाचे व भीतीचे वातावरण पसरले होते. पराभूत मनोवृत्तीने जोर धरला होता.

महाकवी कालिदास

लेखक आदित्य कोरडे यांनी शुक्रवार, 06/10/2017 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
महाकवी कालिदास कुणाला माहिती नाही? फक्त भारतीयच नव्हे तर सगळ्या जगाला ललाम भूत झालेला हा थोर कवी, नाटककार. पण त्याच्याबद्दल, म्हणजे त्याच्या वैयक्तिक, खाजगी आयुष्याबद्दल फारसे काही कळत नाही. एवढेच काय, त्याचा नक्की कालखंड कुठला हे देखील खात्रीलायकपणे सांगता येणे मुश्कील आहे. एक तर विनयामुळे असेल किंवा अन्य काही कारणे असतील; पण त्याने स्वत:बद्दल फारसे काही लिहून ठेवले नाही किंवा लिहिले असेल तरी ते अजून कुठे सापडले नाही. प्रा. वि. वा. मिराशी , रावबहादूर चिंतामणराव वैद्य, प्रा. र. ना. आपटे इ. पंडितांच्या मते तो शकांचा पराभव करणारा सम्राट विक्रमादित्य ह्याच्या पदरी होता.

ये कलरफुल ऐक ना

लेखक पवन तिकटे यांनी बुधवार, 04/10/2017 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
ये कलरफुल ऐक ना ! आज खूप दिवसांनी तिचा फोन आला. ती : काय करतोय मी : हॅलो कोण ?

फसलेल्या उपवासाची कहाणी

लेखक OBAMA80 यांनी सोमवार, 02/10/2017 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
तर हा काळ आहे साधारण २००५ मधील, जेव्हा अस्मादिक आयआयटी खरगपूरमध्ये उच्चशिक्षणासाठी दाखल झाले होते. मार्च महिन्यातला पहिला/दुसरा मंगळवार होता. होमसिकनेसमुळे घरापासून लांब रहाण्याचा एक दिवस संपला, याचा आनंद मी दर दुपारी जेवण करून वसतीगृहाच्या खोलीत टांगलेल्या कालनिर्णयच्या त्या दिवसाच्या चौकोनावर लाल फुली मारून साजरा करायचो. याबद्दल माझा रूममेट मला “रेड क्रॉस XXX” या नावाने चिडवायचा देखील. सावरकर अंदमानात असताना भिंतीवर रेघा मारून दिवसाची सुरूवात करत असे कुठेतरी वाचले होते.

दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - २)

लेखक डॉ श्रीहास यांनी सोमवार, 02/10/2017 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40787 दम्याची कारणं बघण्या आधी दोन महत्वाच्या गोष्टी - १.दमा निदान होण्यास उशीर का होतो २.श्वसननलिकेची रचना दमा किंवा कोणताही जुनाट / chronic आजार निदान होण्यास विलंब होण्यासाठी खालील कारणं आढळली आहेत. A.निरक्षरता - आपल्या देशात जवळपास ३०% (exact आकडा थोडाफार वेगळा असू शकतो) जनता निरक्षर आहे आणि असे लोक सहज फसवले जातात , त्यामुळे निदान आणि उपचार लांबतात किंवा चुकीच्या दिशेनी जाण्याची शक्यता वाढते. B.अंधश्रद्घा - ह्याचं सर्वात मजेदार उदाहरण म्हणजे गणपती बाप्पा दुध प्यायला लागले होते ...

अभिजन आणि बहुजन वर्गातल्या सीमारेषा पुसट करणारा कलावंत

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 01/10/2017 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी कॉलेजला असताना हॉस्टेलला राहायचो. त्या हॉस्टेलला बाहेरच्या राज्यांमधून आलेल्या हाय फाय मॉडर्न अशा मुलीही राहायच्या. 'जो जिता वोही सिकंदर'मधले मॉडेल कॉलेजचे 'पजामा छाप' पोरं रजपूत कॉलेजमधल्या मुलींकडे ज्या नजरेनं बघायचे, त्याच नजरेनं मी आणि माझे 'लुजर' मित्र त्यांच्याकडे बघायचो. लांबूनच. त्या वेळी आमच्यासाठी त्या अप्राप्य अप्सरा होत्या आणि आम्ही मर्त्य मानव. त्या मुली इंग्लिशमध्ये बोलत आणि इंग्लिश गाणी ऐकत. त्यांचा-आमचा आर्थिक स्तरच नव्हे तर अभिरूची आणि तत्सम स्तरही खूप वेगळा होता.

बोली आणि भाषा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/10/2017 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बोली या आदिम भाषा आहेत. संपूर्ण भारतभर आज पंधराशे बोली भाषांचे अवशेष सापडतात. म्हणजे या पेक्षा कितीतरी अधिक बोलीभाषा पूर्वी अस्तित्वात असाव्यात. परंतु त्यांच्यात होणारा दैनंदिन मौखिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे काळाच्या ओघात त्या मरण पावल्या. मृत्यू पावलेल्या भाषा फक्‍त मौखिक स्वरूपात परंपरेने अस्तित्वात होत्या. माणसाच्या अडाणीपणामुळे त्या लिहिल्या जात नव्हत्या. त्या लिहिल्या जात नव्हत्या म्हणून त्यांना लिपी नाही. या भाषा नामशेष झाल्यामुळे त्या कशा स्वरूपाच्या होत्या, हे आज कोणालाही सांगता येत नाही. कारण या भाषांचे दस्ताऐवजीकरण (Documentation) झालेले नाही.

बोली आणि भाषा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/10/2017 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बोली या आदिम भाषा आहेत. संपूर्ण भारतभर आज पंधराशे बोली भाषांचे अवशेष सापडतात. म्हणजे या पेक्षा कितीतरी अधिक बोलीभाषा पूर्वी अस्तित्वात असाव्यात. परंतु त्यांच्यात होणारा दैनंदिन मौखिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे काळाच्या ओघात त्या मरण पावल्या. मृत्यू पावलेल्या भाषा फक्‍त मौखिक स्वरूपात परंपरेने अस्तित्वात होत्या. माणसाच्या अडाणीपणामुळे त्या लिहिल्या जात नव्हत्या. त्या लिहिल्या जात नव्हत्या म्हणून त्यांना लिपी नाही. या भाषा नामशेष झाल्यामुळे त्या कशा स्वरूपाच्या होत्या, हे आज कोणालाही सांगता येत नाही. कारण या भाषांचे दस्ताऐवजीकरण (Documentation) झालेले नाही.