Skip to main content

लेख

निर्दोष घोटाळा !

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी सोमवार, 25/12/2017 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
निर्दोष घोटाळा ! देशाच्या अर्थकारणालाच नाही तर राजकारणालाही कलाटणी देण्यास कारणीभूत ठरलेला 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी मंत्री ए. राजा यांच्यासह सर्व १९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. देशात घडलेल्या एकंदर गैरव्यव्हारापैकी 2 जी स्पेक्ट्रम चा गैरव्यवहार सर्वात मोठा समजला जात होता. ‘कॅग’सारख्या संस्थांनी तर यात एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे सरकारी नुकसान झाल्याचे अहवाल दिले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश सीबीआय ला दिला.

आपल्यातला कुणीही मी

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 22/12/2017 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यातला कुणीही मी कुणाला मी मोठा समजतो, कुणी मला. हा दैनंदिन व्यवहारात सहज प्रत्ययास येणारा अनुभव. कुणीतरी आपल्यास मोठं समजतात. ही बाब सामान्य म्हणून जगताना सुखावणारी असते, याबाबत संदेह नाही. हे सगळं नशीब वगैरे आहे, असं मी म्हणणार नाही. कुणी म्हणत असल्यास अजिबात हरकत नाही, कारण नियती, दैव वगैरे मानणे माझ्या विचारात नाही आणि प्रयत्नांची वाट सोडणे स्वभावात नाही. मला माणसे विचारांनी मोठी असलेली बघायला आवडतात. समाजात माणूस म्हणून वागणं ही देणगी नसते. ते अनुभवाने आणि स्वभावदत्त गुणाने संपादित केलेलं शहाणपण असतं. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला लहान होता आलं पाहिजे.

भेट - शतशब्दकथा

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 20/12/2017 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज ती मला भेटायला येणार होती. अजूनही का येत नाही ? दरवेळी ही उशिरच करते. या वेळेस चांगलाच जाब विचारणार आहे मी. मी हा विचार करतोच आहे तेवढयात तिच्या बांगड्यांचा आवाज आला. एखादया महाराणीच्या आगमनाची वर्दी सेवे-याने द्यावी तशीच वर्दी ह्या बांगड्या देत असत. "कसा आहेस ?" "ठीक ..आजही तू उशीर केलास.." ती फक्त हसली आणि आमचा सगळा राग निवळलासुदधा ती काहीबाही बोलत राहिली. मी फक्त ऐकत राहिलो. निर्विकार होऊन मी फक्त पहात राहिलो. "मॅडम आज का टाईम खतम हो गया. अगली तारीख को आना अभी" त्याच्या कमावलेल्या पोलिसी आवाजात हे वाक्य ऐकले तेव्हा आपण प्रत्यक्षात कुठे आहोत याची दुखरी जाणिव झाली..

शेजाऱ्याचा डामाडुमा- मालदीवचा 'जाहिलिया' इतिहास आणि इस्लामी सत्तावतरण - मालदीव भाग ४

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 20/12/2017 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
मालदीव मालिकेतील आधीचे ३ भाग अनुक्रमणिका वापरून वाचता येतील  मालदीवमधल्या काही कट्टर इस्लामधर्मीय लोकांच्या मते इस्लामच्या आगमनापूर्वी सगळीकडे 'जाहिलिया' काळ म्हणजे अज्ञान-अनागोंदीचे वातावरण होते. त्यामुळे त्याआधीचा इतिहास हा काही फारसा महत्वाचा नाही. पण तसे अर्थातच नाही. काळाच्या ओघात मालदीवच्या सांस्कृतिक मुख्य धारेला वेगवेगळ्या धर्म-वंश-जमातीच्या लोकसंस्कृतींचे प्रवाह येऊन मिळाले आहेत.

बिलिरूबिन : काविळीतला पिवळा डँबिस

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 20/12/2017 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
बिलिरूबिन – हा शब्द काहीसा परका वाटला असेल ना? मला कल्पना आहे की सामान्यजनांना ग्लुकोज, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल हे शब्द खूप परिचित आहेत. पण बिलिरूबिन तसा पटकन लक्षात येत नाही. आता मी जर ‘कावीळ’ हा शब्द उच्चारला तर आपल्या डोळ्यासमोर लगेच डोळे पिवळे झालेला रुग्ण येतो की नाही? मग सोप्पंय. हा जो पिवळेपणा येतो तो बिलिरूबिन या शरीरातील रंगद्रव्यामुळे. निरोगी अवस्थेत हे बिलिरूबिन आपल्या रक्तात अल्प प्रमाणात असते. त्यामुळे त्याचा पिवळा रंग आपल्या अवयवांत बिलकूल दिसत नाही. पण काही रोगांमध्ये जेव्हा ह्याचे प्रमाण वाढू लागते तेव्हा हळूहळू विविध पेशी पिवळ्या होऊ लागतात.

उल्का वर्षावाच्या निमित्ताने…

लेखक हेमंत ववले यांनी मंगळवार, 19/12/2017 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
१३ डिसेंबरच्या रात्री १० पासुन १४ डिसेंबरच्या पहाटे ३ वाजेपर्यंत, उल्कावर्षाव होणार आणि जगभरातील कोणत्याही स्थानावरुन तो दिसणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले होते. डिसेंबर मध्ये होणारा हा उल्कावर्षाव तसा नवीन नाही. दरवर्षी याच तारखांना हा उल्कावर्षाव होत असतो. ताशी किमान १०० ते १२० उल्कापात होताना दिसण्याचा अंदाज असतोच. यावर्षी देखील असाच अंदाज होता. यापेक्षा अधिकवेगळेपण यावर्षीच्या उल्का वर्षवाचे होते ते म्हणजे आकाशात चंद्राचा अभाव. चंद्रप्रकाशाचा अभाव म्हणजे तारांगण पाहण्याची सुवर्णसंधीच. आणि त्यातच उल्कावर्षाव म्हणजे ही तर दुधात साखर. दिवस सुटीचा नव्हता.

राजकारणावर बोलू काही!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी सोमवार, 18/12/2017 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
(देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. या निकालाचं पहिलं वाहिलं विश्लेषण..) निकाल लागला !! मराठी हि मोठी अलंकारिक भाषा आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे आपल्या मातृभाषेचे वैशिष्ट्य.. 'निकाल लागला' हा शब्द सुद्धा असाच दोन आशयांनी येणारा. निकाल लागला, असं सौम्यपणे म्हटलं तर निकाल घोषित झाला, असा त्याचा सरळ अर्थ. परंतु हाच शब्द दुसऱ्या संदर्भाने उच्चारला तर त्याचा भलताच अर्थ निघतो. हेच बघा ना, आज गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे.

भातुकली

लेखक जागु यांनी सोमवार, 18/12/2017 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक लहान मुलीचा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे भातुकली. आईच्या उबदार सहवासात आई ज्या काही पाककलेच्या किंवा घरातील कामांच्या क्रिया करते त्याचे हुबेहूबअनुकरण भातुकलीच्या खेळामध्ये मुली उतरवत असतात. भातुकलीची आईबरोबर नाळ जुळलेली असते म्हणूनच तर भातुकलीचा खेळ मुलींसाठी जिव्हाळ्याचा असतो असे मला वाटते. माझी भातुकली आमच्या पडवीत किंवा ओटीवर मांडली जायची त्यामुळे पडवीत खेळत असले तर तिथे असलेल्या दरवाज्याना पडदे लाव, ह्या खुंटी पासून त्या खुंटीपर्यंत घरातील चादरी आणून बांधून खोली बनवायची.

विडंबन : निरीश्वरवाद, निधर्मी संकल्पना - 'फुल्टू' एंटरटेनमेंट विथ 'टील डेथ' व्हॅलिडिटी.

लेखक रंगीला रतन यांनी शुक्रवार, 15/12/2017 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
निरीश्वरवाद आणि निधर्मी नावाच्या संकल्पना कशा अस्तित्वात आल्या आणि का याच्यावर बरेच मंथन झाले आहे. यावर बऱ्याच थेअरीज आहेत. पैकी उत्क्रांतीवादानुसार निरीश्वरवाद आणि निधर्मी यावर बऱ्याच लोकांचा विश्वास असतो याचं कारण माणुस उत्क्रांत झाल्यावर त्याला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असणार. अतिमानवाच्या (मंद)बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणाऱ्या अनिश्चिततेवर, त्यातून येणाऱ्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक, बौद्धिक दरिद्री(दळभद्री) कल्पना विकसित केल्या त्यात निरीश्वरवाद आणि निधर्मी यांचा क्रमांक सर्वात वरचा लागतो.

'संस्कृती आणि समाज’

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/12/2017 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आज संस्कृती हा शब्द कोणी नुसता उच्चारला तरी आपण त्या व्यक्‍‍तीकडे चमकून पहावे अशी या शब्दाची जादू वा दहशत निर्माण झाल्याचे लक्षात येते. देशात किमान ज्या बाबींचे राजकारण होऊ नये असे वाटते त्या गोष्टींचेही राजकारण होऊ लागल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक व्यक्‍तिगत बाबींचे राजकीयकरण होऊन त्यावर राजकारण करणे सोपे झाले आहे. आज संस्कृती या संज्ञेचेही राजकीयकरण अगदी ठरवून होत असल्याचे लक्षात येते, नव्हे संस्कृती हा राजकारणाचा प्रमुख मुद्दा होऊ पहातोय की काय अशी शंका येऊ लागते.