Skip to main content

लेख

सरसगडची सुरस सहल

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 06/03/2018 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
सरसगडाच्या ९६ पायरी जिन्याच्या पायथ्याशी आम्ही अडलो होतो. छे! हा तर अवघड रॉक पॅच होता. हा काही आपल्याला जमणार नाही. चला परत. कारण पालीत राहणार्‍या एका अनुभवी माणसाने आम्हाला सांगितलेलेच होते की साठीच्या वरील लोकांसाठी सरसगड काही सोपा नाही. त्यांनी तर जाऊच नये तिथे.

लोकशाही झिंदाबाद

लेखक परशुराम सोंडगे यांनी मंगळवार, 06/03/2018 05:18 या दिवशी प्रकाशित केले.
आता आताचं ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या.गाव गावचं पुढारी निवडण्यात अालं.या गाव पातळीवरच्या निवडणूकात भी भारी रंगत अाली.नात्या गोत्यात,पावण्या रावळयातचं फाईटी लागल्या.सख्या सासू सुना आमने सामने अाल्या.भावा भावातल्या दुश्मन्या टोकाला गेल्या.

*‘तो’ परत येईल...*

लेखक महामाया यांनी सोमवार, 05/03/2018 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
हॉलीवुडच्या नायिकेचा आशावाद नवरा कसाहि असला तरी त्याच्याच सोबत आपलं संपूर्ण आयुष्य काढण्याची भाषा करणारी बायको, फक्त भारतीय चित्रपटांमधेच नव्हे, तर हॉलीवुडच्या चित्रपटांमधे सुद्धा नायिकांनी रंगवली आहे. नवरा बाहेरच्या बाईच्या नादी लागला तरी त्याची सेवा करून त्याला वठणीवर आणण्याची भाषा देखील प्रसंगी नायिका करतांना दिसतात. नवरा किती ही वाईट असला तरी आपल्या चित्रपटांचा शेवट मात्र गोड होतो.

मराठी दिन २०१८: धुयानी होयी नी धुयवड (अहिराणी)

लेखक आर्या१२३ यांनी सोमवार, 05/03/2018 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
धुयानी होयी नि धुयवड लोकेसहो! धुयवड खेयनात ना! आम्हन्या धुयामां बी होयीना येगळाच रंग चढस. मन्हा बाबा सांगे..त्यासन्हा टाईमले धुयवडनी मोठी धमाल व्हये. आते आम्ही ६वी गल्ली ना लोके तुम्हले माहीती नैत. धुळामां हरेक गल्ली म्हन्जे इशेष शे. म्हंजे पाहा, हाई माशाना काटा र्हास ना तसा धुयाना मझार पारोया रोड जास. त्याले लागून काटकोनमा पह्यली गल्ली, २री गल्ली(तेली गल्ली) ४थी, ५वी, ६वी, ७वी गल्ली शेतस. ६वी गल्ली म्हण्जे दादा लोकेस्नी गल्ली समजेत. सहावी गल्लीना एक साईडले माधवपुरा. बठठा.... काय म्हंतस त्याले संवेदनशील भाग बरं!! गल्लींन एक टोकले सुभाषनगर. म्हणजे जुन धुळे. जुन धुयामा खुनी मस्जिद.

श्रीदेवी जाते जिवानिशी

लेखक कुमार जावडेकर यांनी सोमवार, 05/03/2018 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीदेवीच्या आणि आमच्या वयात तसं बर्‍यापैकी अंतर होतं. आम्ही महाविद्यालयात प्रवेश करेपर्यंत श्रीदेवीचा 'मिस्टर इंडिया' आणि (आपल्या) माधुरीचा 'तेज़ाब' येऊन गेले होते. त्यामुळे तिच्या घडलेल्या 'जुदाई'मुळे आम्हीं जरी हळहळलो असलो, तरी त्याचा फारसा 'सदमा' आम्हांला पोहोचला नाही आणि जखम भळभळली नाही. नव्वदीत श्रीदेवीला सोडून (किंवा धरून) अनिल कपूरनं (आपल्या) माधुरीला हिरॉईन केलं याचा मात्र राग आम्हीं मित्रा-मित्रांमधे चांगलाच आळवला / चघळला होता. एकीकडे श्रीदेवीचे 'लम्हें', 'खुदागवाह',लाडला' वगैरे बघणं न थांबवता...

रंगंपचमी आपली आणि सह्याद्रीची सुध्दा..

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 02/03/2018 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
कालच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काही ओव्या वाचनात आल्या. त्यातील काव्यात्मकतेचा भाग , म्हणजे लक्ष्यार्थ जरी सोडला तरी माऊलींना ऋतुचक्रातील बारकावे अगदी व्यवस्थित माहीती होते हे समजते.

डायरी

लेखक चेतन०२०१२ यांनी शुक्रवार, 02/03/2018 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
हे कस काय शक्य आहे? मला अजूनही विश्वास बसत नाहीये. पण मग मी आत्ता १५ मिनिटांपूर्वी पाहिलं ते काय होत? But today it’s been 10 years. म्हणून काय झाल, याचा अर्थ असा नक्कीच होत नाही की मी जे पाहिलं ते खोट आहे. माझ्याच डोक्यात चाललेली ही कालवाकालव माझाच अंत पाहते आहे. खर सांगू मला काहीच कळत नाहीये की मी खुश व्हायला हव की अचंबित. अरे After bloody 10 years I just saw her with my own two eyes. मला शहानिशा करन भागच होत की मी आत्ता जे पाहिलं ते खर होत की फक्त माझ्या मनाचे खेळ होते. मी आत्ता हा इथे उभा होतो. काय करत होतो बर ??? हा बिल भरत होतो. कसलं बर?? आईला ह्या पोरीने वेड लावलाय.

तंदुरुस्त का नादुरुस्त ? : भाग १

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 02/03/2018 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या) प्रास्ताविक माझी या आधीची आरोग्य-लेखमाला चालू असताना मित्रवर्य ‘अनिंद्य’ यांनी या विषयावर लिहिण्याची सूचना केली. मग मी त्यावर विचार केला. आधी वाटले, की ते म्हणताहेत तर लिहून काढू एक लेख लगेच. पण, जसा मी वाचन करीत या विषयाच्या अंतरंगात शिरलो तेव्हा वस्तुस्थिती लक्षात आली. या विषयाची व्याप्ती नक्कीच मोठी आहे. त्याला जाणूनबुजून एका लेखात कोंबून बसवणे हे त्यावर अन्याय केल्यासारखे होईल. तेव्हा या विषयाचा सखोल अभ्यास करून त्याचा समग्र वृत्तांतच वाचकांसमोर मांडवा असे ठरवले व त्यातूनच या लेखमालेचा जन्म होत आहे.

भाषा अहिराणी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/03/2018 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे उत्तर महाराष्ट्रातील खानदेशात बोलली जाणारी प्रमुख भाषा ही अहिराणी भाषा आहे. पूर्वी घरात, मित्रांत, नातेवाईकांत, बाजारात, दुकानात, दैनंदिन व्यवहारात, शेती व्यवहारात सर्वत्र अहिराणी भाषा बोलली जायची. घरात पूर्णपणे अहिराणीत संभाषण होत असे. कारण खानदेशातली अहिराणी ही लोकभाषा आहे. म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील खानदेशची प्रमाणभाषा अहिराणी आहे. त्या काळातला प्राथमिक शाळेतला शिक्षक असो की माध्यमिक शाळेतला. शाळेतून शिक्षक बाहेर पडले की ते घरी-दारी अहिराणी भाषा बोलायचे. शाळेत विद्यार्थ्यांनाही आपसात अहिराणी बोलायला अलिखित परवानगी होती.

एका सायन्स प्रोजेक्टची गोष्ट

लेखक बाजीप्रभू यांनी गुरुवार, 01/03/2018 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो बाबा, तुमचे प्रोजेक्ट्स आजी ने बनवले... माझे तुम्ही बनवताय आणि माझ्या मुलांचे मीच बनवणार आहे कि भविष्यात!! ओपन सिक्रेट आहे हो हे, जजेसनाही माहित असतं कि पॅरेन्ट लोकच बनवतात सायन्स प्रोजेक्ट्स, कशाला भाव खाताय? बनवा कि माझा सायन्स प्रोजेक्ट". आमचं कॉन्सेप्ट, तुमचं लेबर वर्क आणि स्नेहा आणि मी प्रेसेंटेशन करणार, म्हणजे डिमांड-प्रोडक्शन आणि मार्केटिंग असं टिमवर्कचं वर्तुळ पूर्ण होईल सिम्पल. अश्या आर्ग्युमेंट्स करत माझ्या आळशी लेकीने माझ्या गळ्यात एक सायन्स प्रोजेक्ट अडकवला त्याची हि गोष्ट, मी :- बरं विषय काय आहे? ती :- ते माहित नाही तुम्हीच ठरवा. मात्र वर्किंग हवं मी :- ऑ!!