Skip to main content

लेख

ओंकार पत्की - काही आठवणी....

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 29/11/2018 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
ओंकारवर लेख लिहायला घेतला होता, पण काय लिहू आणि काय नाही असं झालं.... या केवळ त्याच्या आठवतात तशा आठवणी.... त्याची आणि माझी मैत्री गेल्या तीस - बत्तीस वर्षांची. मला आठवतं आम्ही सहावीत असताना तो आमच्या शाळेत आला आणि पहिल्या दिवसापासून असा काही रमला होता की जणू माँटेसरीपासूनच आमच्याबरोबर होता! तेव्हापासूनच तो असा बिनधास्त आणि काहीसा विक्षिप्त होता. पुढे सातवी - आठवी दोन वर्ष आम्ही एका बेंचवर शेजारी बसत असल्याने बडबड केल्यामुळे कित्येकदा एकत्रं शिक्षा भोगली असेल याचा हिशेबच नाही! मला आठवतं सातवीत असताना त्याच्या हात फ्रॅक्चर झाला होता.

माझी पहिली मराठी साहस कथा : मिशन वारी

लेखक अमोल पोतनीस यांनी गुरुवार, 29/11/2018 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मी मिसळपाव वर पहिल्यांदाचं लिहीत आहे. जर चुकीच्या विभागात ही माहिती लिहिली असेल तर कृपया सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती. नुकतेच मी माझे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे नाव आहे "मिशन वारी". कव्हर पेज पंढरीच्या वारीच्या पुणे ते सासवड या टप्प्याला अतिरेकी आपले लक्ष्य करतात आणि बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना आखतात. मिल्ट्री इंटीलिजन्सला याचा सुगावा लागतो आणि हे आव्हान पेलण्याची जबाबदारी टाकण्यात येते कॅप्टन आकाश आणि त्याच्या टीमवर.

बाप्पा

लेखक Prajakta Yogiraj Nikure यांनी बुधवार, 28/11/2018 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा धीन ता धीन धीन ता धीन ता धीन धीन ता धीनधीनधीनाक धीनधीनधीनाक बाहेर ढोल ताशांचा आवाज घुमत होता . ढोल ताशा पथक मोठ्या जल्लोषात बाप्पाचं स्वागत करत होते . बाप्पा पण मस्त आपली बॅग वैगेरे भरून आपल्या लाडक्यांकडे १० दिवसांसाठी रहायला आला होता आपल्या आईला सोडून. त्यांच्या आईने पण मस्त खाऊ वैगेरे देऊ का विचारलं बाप्पाला पण बाप्पा कसला खाऊ घेतोय आपल्या आईकडून उलट त्यानेच सांगितलं की , “ मी मस्त खाऊ खाणार आहे माझ्या भक्त्यांकडे जाऊन . काय ते उकडीचे मोदक , खोबऱ्याचे मोदक, वेगवेगळे पदार्थ , विचार करूनच तोंडाला पाणी सुटतंय .

पर्याय

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 24/11/2018 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
" अशी जवळ ये ना " नाही म्हणायचं होत तिला पण तिच्या तोंडातून शब्दच बाहेर नाही पडले . तो जवळ येतच गेला .... " आई " ती कळवळली . एक जोरदार फटका पडला होता . हि बसायची जागा आहे कि फटाके मारायची आईला तर काही कळत नाही . " अग कार्टे किती वेळ लोळत पडली आहेस उठ आणि आवर तुझं " छे किती भारी स्वप्न होत आणि आईनं काय वाट लावली त्याची . परत असं पालथं झोपायचं नाही किती जोरात मारलय सगळी बोट उठली असतील . लाल झालं असेल . बघावं म्हटलं तर तेही सोपं नाही असू दे . ती पार्श्वभाग चोळत मनात म्हणाली . ============================================================= " अग काय कशी लाली आली आहे ?

पुलं "दैवत"

लेखक MipaPremiYogesh यांनी शुक्रवार, 23/11/2018 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
आमचं कुलदैवत ~ पुलदैवत पुलंची जन्मशताब्दी असं वाचल्यावर जरा आश्चर्यचकित झालो. पुलं आज असते तर 100 वर्षाचे झाले असते. पण झाले असते? पुलं गेलेच कुठे आहेत..ते अजूनही त्यांच्या पुस्तकातून, वेगवेगळ्या व्यक्तीरेखांतून आजूबाजूलाच आहेत. परवा कोकणात फिरतांना अंतू बरवा दिसले..हेदवी ला शिवराम गोविंद दिसले, बेळगाव- कारवार ला रावसाहेब दिसले. पुलं त्यांच्या पुस्तकांमधून, नाटकांमधून अजूनही आपल्याला भेटतातच की.

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ८

लेखक कलम यांनी सोमवार, 19/11/2018 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत सफाईदार वळणे घेत इन्स्पेक्टर पाटलांची पोलीस व्हॅन 'ग्रीन वाइल्ड रेसोर्ट' मध्ये शिरली तेव्हा इन्स्पेक्टर पाटील सकाळपासून घडलेल्या घटना आठवत होते. आज सकाळी सहा वाजता जेव्हा इन्स्पेक्टरांना फोन आला तेव्हा ते मॉर्निंग वॉक करून नुकतेच घरी पोचलेले होते. रिसॉर्ट मध्ये खुनाची केस हि फार गंभीर बाब होती. एक तर ग्रीन वाईल्ड हे फार मोठं आणि नावाजलेलं रिसॉर्ट होतं आणि दुसरं म्हणजे खुनाच्या बातमीनं रिसॉर्ट मध्ये वास्तव्यास असलेल्या इतर लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची दाट शक्यता होती. सकाळच्या नाश्त्यासाठी पण न थांबता पाटील सगळ्यात आधी खून झालेल्या स्थळी पोहोचले.

माझं पहिलं ई - पुस्तक

लेखक नूतन यांनी सोमवार, 19/11/2018 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझं पहिलं ई-पुस्तक 'अरण्यबंध'काल बुकगंगा.कॉम वर प्रकाशित झालं. हे पुस्तक म्हणजे प्रसिद्ध बंगाली पुस्तक "आरण्यक"( लेखक श्री बिभूतीभूषण बंदोपाध्याय) चा मराठी अनुवाद आहे. पुस्तकाविषयी थोडक्यात : कोलकात्यासारख्या महानगरात वाढलेला सत्यचरण एका जमिनदाराच्या मालकीच्या जंगल महालाचा इस्टेट मॅनेजर म्हणून रुजू होतो. पण त्या निर्जन अरण्यात आल्यानंतर आल्यापावली परत जाण्याचा विचार ते त्या अरण्याच्या प्रेमात पडणं, या परिवर्तनाचा आलेखं मांडणारं हे पुस्तक..... या सोबत ओघाने येणारी निसर्गवर्णनं, भेटलेली माणसं...

घालमेल

लेखक लौंगी मिरची यांनी सोमवार, 19/11/2018 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
“कबूल का करत नाहीस ? एकदाचं मान्य करुन मोकळी हो . रोजचं तीळ तीळ मरणं . त्यापेक्षा, एकदाच हो, आहे माझं तुझ्यावर प्रेम, तुझ्याशिवाय़ काहीच सुचत नाही, म्हण आणि मोकळी हो .” तो आज फार बोलत होता, माझी घुसमट पाहवत नव्हती त्याला. पण, मी एकटी ने मान्य करुन काय होणार होतं? जो मला हे मान्य करायला सांगतोय तो मात्र कुणा दुसरीतच अडकलाय आणि हो प्रामाणिकपणे हे पहिल्याच भेटीत सांगितलं. मग तरीही मी त्याच्यात का अडकली असेन? गुंतणं आपल्या हातात नसतं, हेच खरं. “मला समजून का घेत नाहीस? प्रेमाच्या भावना बदलता येत नसतात..

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ७

लेखक कलम यांनी शनिवार, 17/11/2018 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
"तुम्हीच मिसेस शांभवी सरपोतदार ना?" इन्स्पेक्टर पाटील ह्यांचा आवाज शांभवीच्या अवाढव्य बंगल्यात घुमला. "अं...हो मीच शांभवी सरपोतदार." शांभवीनं अत्यंत खालच्या आवाजात उत्तर दिलं. 'अमितचा खून झालाय' हे अथर्वनं बोललेलं वाक्य अजूनही तिच्या डोक्यात फिरत होतं. कशीबशी सावरून जणू काही आपल्याला काही झालंच नाहोये हे अथर्वला भासवत ती जरी खाली हॉल मध्ये पोहोचलेली असली तरी तिचं हृदय एवढ्या जोरात धडधडत होतं कि आता ते फुटून बाहेर पडतंय की काय असं तिला वाटत होतं. "काय झालं मिसेस शांभवी सरपोतदार? म्ही फारच बिथरलेल्या दिसताय." इन्स्पेक्टर पाटील एक डोळा बारीक करत म्हणाले. "नाही, असं काही नाही.

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला?

लेखक shantanu Paranjpe यांनी शुक्रवार, 16/11/2018 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
Shivaji Maharaj रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला!