Skip to main content

लेख

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ११

लेखक कलम यांनी बुधवार, 12/12/2018 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारी चारच्या दरम्यान इन्स्पेक्टर पाटलांच्या केबिन वर टकटक झाली. "प्लिज कम इन, राऊत." समोर सबइन्स्पेक्टर राऊतांना बघून एवढ्या दुपारी पण इन्स्पेक्टर पाटलांना आशेचा गारवा झोंबल्यागत झालं "मग कशी काय झाली शोधाशोध?" "सर, अमित च्या घरात संशय घेण्यासारखं काही सापडलं नाही. त्याची बँक अकाउंट्स, सेविंग्स ह्याबद्दलची कागदपत्रं मिळाली आहेत आणि ती बाहेर साळुंखे कडं तपासासाठी दिली आहेत. त्याच्या बेडरूमच्या कपाटाच्या आतल्या कप्प्यात हि एक हार्ड डिस्क मिळालीय. बरीच आत मध्ये लपवून ठेवलेली दिसली. बघुयात यात काही मिळतंय का?" इतक्यात इंस्पेक्टरांच्या टेबलावरचा फोन खणखणला.

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग १०

लेखक कलम यांनी मंगळवार, 11/12/2018 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग १० दुसया दिवशी सबइन्स्पेक्टर राऊतांना घेऊन इंस्पक्टर पाटील सकाळी सकाळीच अमितच्या घरी पोचले. कुणा मयताच्या घरी दुसऱ्या दिवशीच जाऊन त्याच्या आप्तजनांना तपासाच्या नावाखाली त्रास देणं खरं तर इन्स्पेक्टर पाटलांना आवडायचं नाही, पण तरीही असे प्रसंग महिन्यातून एक दोनदा तरी येत. तीन वेळा बेल वाजवल्यावर कुणा एका स्त्रीनं दरवाजा उघडला. पोलिसांना एवढ्या सकाळीच दारात बघून तिला आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं. इन्स्पेक्टर पाटील हॉल मध्ये इकडं तिकडं बघत सोफ्यावर जाऊन बसले. घरात बरीच माणसं होती, कदाचित अमितच्या आणि इशाच्या घरची माणसं असावीत.

कथा विविधा

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 10/12/2018 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, विविध विषयांवरील लेखन आणि कवितांमुळे आपल्या सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या मिपा सदस्या ज्योती अळवणी यांच्या सात निवडक कथांचा समावेश असलेल्या ‘कथा विविधा’ ह्या त्यांच्या पहिल्या कथा संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास सपत्नीक उपस्थित राहण्याचा योग काल जुळून आला. मुळात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची माझी हि पहिलीच वेळ होती, त्यामुळे चिन्मयी सुमीत, सतीश राजवाडे, चिन्मय मांडलेकर, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, डॉ. स्नेहलताताई देशमुख, खा. पूनम महाजन, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर, समीरा गुजर आणि प्रा.

नंदिनीची डायरी - तेव्हा आता पुढे

लेखक aanandinee यांनी सोमवार, 10/12/2018 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
नंदिनीची डायरी - तेव्हा आता पुढे थोडं वैतागून, थोडं निराशेने मी फोन ठेवला. एका एजन्सीची नवीन ब्रांच आमच्या शहरात उघडणार होती. वेगवेगळ्या मेंटल हेल्थ एजन्सीसबरोबर काम करणं मला सोयीचं वाटतं. एकाच ठिकाणी पाच दिवस काम करण्यापेक्षा हे variation मला आवडतं. एकाच जागी बांधल्यासारखं वाटत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव मिळतात आणि flexibility ही राहते. या नवीन एजन्सीबरोबर काम करणंही मला आवडलं असतं. पण ते होण्यातलं दिसत नव्हतं. या घोळात घरून निघायलाही उशीर झाला. पेशंट्सबरोबर सेशन सुरू करण्याआधी थोडा वेळ पोहोचलं तर मला स्वतःचं मन शांत करायलाही काही वेळ मिळतो.

एकच प्याला !!!

लेखक किल्लेदार यांनी शुक्रवार, 07/12/2018 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा वाचण्यात आलं होतं की तुमचा आवडता मद्याचा प्याला तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडेफार सांगू शकतो... आणि मला एक जुना किस्सा आठवला. मित्राला खोकला झाला म्हणून त्याला घेऊन एकदा ब्रँडी आणायला वाईनशॉप मध्ये गेलो होतो. काउंटरवर ब्रँडी मागतांना, खुद्द गांधींनी केली नसती एवढी याची चुळबुळ चाललेली. बाटली घेऊन पैसे चुकते केल्यावर चेहऱ्यावर जमेल तितकी अजीजी आणून "हमे नशा नही करना है, दवा के लिये ले रहे है" असा डायलॉग जेव्हा त्याने दुकानदाराला मारला, तेव्हा मी मात्र स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. तस्मात...ब्रँडी हे जरा पापभिरू लोकांचं मद्य असावं.

एक ट्रेन: असहायतेची

लेखक कलम यांनी बुधवार, 05/12/2018 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
गावाबाहेरच्या एका गचाळ भागात एक तितकीच गचाळ वस्ती होती, अगदी रेल्वे लाईनच्या बाजूलाच. रेल्वेमधून लोकांनी फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि कागद वस्तीच्या सभोवताली पसरलेले असत. या सगळ्या मधूनच नेहमी तुंबल्यानं पूर आल्यासारखं एक गटार पण वाहायचं. त्याचशेजारी वस्तीतली काही मुलं उकीडवी बसलेली असत तर बाकीची आजूबाजूच्या उकिरड्यात खेळत बसलेली असत. ह्या घाणेरड्या खोपटांच्या गर्दीतच अगदी शेवटी बाबू आणि लक्ष्मीचं एक खोपटं होतं. बाबू आणि लक्ष्मीचं लग्न होऊन जवळपास १० वर्ष झाली होती. लग्नानंतर पहिल्या वर्षाच्या आतच सुमनचा जन्म झाला.

वाढदिवस

लेखक निओ यांनी मंगळवार, 04/12/2018 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा आज वाढदिवस. सकाळी अंथरुणात उठून बसला. काल रात्री बारा पर्यंत जागाच होता. पण शुभेच्छा द्यायला तो सोडून कोणीच जागे नव्हते. whats app वरचे काही फुटकळ मेसेज तपासून हा पण शहाण्या सारखा गपचूप झोपी गेला. तर सकाळी उठून बसला. कोणाची काही चर्चा नाही, भेटवस्तू काय हवी विचारणा नाही, बाहेर कोठे जायचे काही तयारी नाही. आपला वाढदिवस विसरले कि काय हे लोक, असंच त्याला वाटून गेलं. इतक्यात आलीच ...लगबगीने हसत हसतच बायको आली. येऊन सरळ मांडीवरच बसली. आयला हे काय... ! म्हणजे एकीकडे बरे वाटले.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): २. केडगांव चौफुला ते इंदापूर

लेखक मार्गी यांनी रविवार, 02/12/2018 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: २. केडगांव चौफुला ते इंदापूर १३ नोव्हेंबरची पहाट. आज दुस-या दिवशी केडगांव चौफुल्यावरून निघायचं आहे. चांगला आराम झाल्यामुळे पहाटे फ्रेश वाटतंय. उजाडेपर्यंत तयार होऊन निघालो. इंदापूरपर्यंत आज मस्त हायवे आहे. कालच्या तुलनेत कमी वेळ लागणार. पण सायकल प्रवास अपेक्षेनुसार होत नाहीत! आजही त्याचा अनुभव येणार आहे. निघालो तेव्हा कडक थंडी आहे. ह्या प्रवासात दररोज सुरुवातीला एक- दिड तास मला कडक थंडी लागणार आहे. आणि नंतर दुपारी कडक ऊनही असेल. पहाटेच्या थंडीत हायवेचा आनंद घेत सायकल चालू केली.

नदी आणि गाव

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/12/2018 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे गाव तिथं नदी होतीच. आजही ज्या गावाला नदी नाही असे फार क्वचित गावं असतील. गाव तिथं नदी नव्हती, तर जिथं नदी होती तिथं गावं वसली. नदीच्या काठांवर लोकवस्ती झाली. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन नाही. जिथं जिथं पाणी होतं त्या पाणवठ्यांच्या काठांवर गावं वसली. म्हणून कोणतं गाव कोणत्या नदीच्या काठावर हे अजूनही मुद्दाम विचारलं जातं. अथवा कोणत्या गावाजवळून कोणती नदी वाहते याचीही उत्सुकता असते. जरी अनेक नद्या वाहता वाहता आज आटून गेल्या आहेत. नदी लहान असो की मोठी. आज वाहत असो की नसो. आजची गावंही नदीच्या‍ किनारीच सापडतात. जीवन देणारी नदी ही माणसाची देवता आहे.

भेट

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 30/11/2018 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
खरतर हे लिखाण आधीच लिहुन ठेवलं होतं पण बोका — ए — आझमच्या दुखद बातमीने अचानक स्मशान वैराग्य आल्यासारखं झालंय , सतत हे आठवतंय.... भेट... एक ठरवुन न ठरवलेली.... असेल कदाचित ती मागच्या जन्मी ठरलेली, किंवा त्याहुन आधीची... नाहीतर उगाच का माणसे येतात समोरासमोर काहीही लागेबांधे नसताना? उगाच का पहिल्यांदा पाहिल्यावर जन्मोजन्मीची खुण पटते? चेहरा जरी बदलला असला तरीही आत्मा आत्म्याला बरोबर ओळखतो. कुणाला पाहुन आनंद होतो तर कुणाला पाहुन राग येतो. आधी पाहिलेच नाही तर अशा भावनांचं कारणच काय? कदाचित सर्वच आहोत प्रवासी , अनादि काळापासुन , काळाचा फेरा आला की लागतो प्रवासाला.