Skip to main content

लेख

मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत? भाग १/३ (आकारमानाने पडणारे फरक)

लेखक पुष्कर यांनी मंगळवार, 15/01/2019 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपीठिका सध्या मी राहतो तिथे उन्हाळा चालू आहे. दक्षिण गोलार्धात असल्यामुळे इथले ऋतू आपल्यापेक्षा उलटे चालतात. त्यामुळे सध्या जिकडे तिकडे भसाभस मुंग्या अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडत आहेत. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत ह्या मुंग्यांची मजा बघत बसणे हा एक आवडता छंद झाला होता. घरात कुठे मुंग्या लागल्या असतील तर त्यांची रांग बघत बघत मूळ स्रोत शोधायचा प्रयत्न करणे, रांगेच्या मध्येच बोटाने पुसून त्यांची रांग अस्ताव्यस्त करणे, मुंग्यांच्या भोवती पाणी शिंपडून त्याचं वर्तुळ करणे आणि मुंग्यांना हा भवसागर पार करून जाता येतं का ते पाहणे - असले अनेक उद्योग तेव्हा केलेत!

"Catch me if you can”

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 14/01/2019 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
"कंबक्त, कभी बेसूरा गा नही सक्ती." लता मंगेशकर यांना उद्देशून (त्या वयाने लहान असताना) एका विख्यात संगीतकाराने वैतागून (आदरपूर्वक) टिप्पणी ऊद्गारली होती असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं. “तुझं वंय कोवळं आहे,त्यामुळे तुझ्या गळ्याची क्षमता उत्तम आहे,सुरात आणि तारसूरात गायला तुला सहज जमत असणार शिवाय ह्या वयात तुला तल्लख स्मरण शक्ती आहे.

प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ? भाग २/३

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 12/01/2019 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ? भाग २/३ डॉ. जगन्नाथ दीक्षित ( एम० डी०), डीरिडर, लुईझियाना आणि राजीव उपाध्ये, पुणे. मागील भागाचा दुवा -http://aisiakshare.com/node/7041 (10)   प्राणायामात मेंदूत नक्की काय होते ?           सर्वसाधारण श्वसन हे अनैच्छिक असते आणि त्याचे नियंत्रण आयुष्यभर मेंदूतील एका छोट्या पेशीसमूहाकडून केले जाते. या पेशीसमूहाचा आकार काही मिलीमिटर इतका लहान असतो. त्यांचे कार्य काही वेळा औषधामुळे बदलू शकते.

विलक्षण २.०

लेखक दीपक११७७ यांनी शुक्रवार, 11/01/2019 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
बांबूच्या झाडाला फुले येणे हि एक विलक्षण घटना आहे. बरीच बांबूची झाडे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ठराविक कालावधीत बहरतात व मग नष्ट होऊन जातात. हा ठराविक कालावधी बांबूच्या प्रजाती निहाय वेग-वेगळा आहे. जसे; 1. Bambusa bambos या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ३२ वर्षांनी एवढा आहे. 2. Phyllostachys bambusoides या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर १३० वर्षांनी एवढा आहे. 3. Chusquea abietifolia या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ३२ वर्षांनी एवढा आहे. 4. Phyllostachys nigra f.

विलक्षण १.०

लेखक दीपक११७७ यांनी बुधवार, 09/01/2019 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतील अलबामा राज्यातील गॉंडस डेन शहरातील एका विद्यर्थ्याला त्याच्या मित्रांची खिल्ली उडवण्याची-टिंगल करण्याची इच्छा झाली. जसे कोकिळेला चिडवण्यासाठी तिच्या कुहू-कुहू नंतर आपण ही कुहू-कुहू करतो तसले. पण या मुलाची पद्धत एकदमच वेगळी होती, केवळ वेगळी नसून विलक्षण सुद्धा होती.

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं

लेखक जागु यांनी मंगळवार, 08/01/2019 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
मळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पाणी जातं, गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं. माझ्या माहेरच्या पूर्ण वाडीत हे पाटाच पाणी पूर्वी झरझर वाहायचं आणि फक्त जाई जुईलाच नाही तर भाज्या, माड, सुपारी, चिकू अशा सगळ्याच झाडांभोवती पिंगा घालायचं. ह्या पिंग्यात पिंगा धरायला मला खूप आवडायचं. वाडीत मध्यवर्ती ठिकाणी आमची विहीर होती.

पहिले महायुद्ध, प्रकरण दुसरे, भाग २ बेल्जियमवरचा बलात्कार

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 07/01/2019 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले महायुद्ध, प्रकरण दुसरे, भाग २ बेल्जियमवरचा बलात्कार मागील भागात आपण श्लीफेन योजना आणि त्याद्वारे जर्मनीने बेल्जियमवर हल्ला का केला हे पहिले. आता आपण ह्या भागात बेल्जियमचा लढा आणि पुढे काय झाले ते पाहूयात Simple, Free Image and File Hosting at MediaFire तर ४ ऑगस्ट १९१४रोजी जर्मन सैन्याने बेल्जियमची हद्द ओलांडली.

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : १२

लेखक रा.म.पाटील यांनी रविवार, 06/01/2019 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १२ ( Decorate Your Love ) नववर्ष.. प्रेमाचा निरोप.. ३१ डिसेंबर.. आजचा दिवस.. सारे जग आज एकवटणार.. नववर्षाच्या स्वागतासाठी.. गतवर्षाला निरोप देऊन.. तोही आज निरोपच देत होता.. तिला.. त्याच्या एकतर्फी प्रेमाला.. सारे जग आज गतवर्षातील कटू आठवणी विसरून नव्या आठवणीसाठी सज्ज होत होते.. पण त्याच्यासाठी तिच्या गतवर्षातील आठवणी ह्या गोड होत्या.. त्या तो कधीच विसरू शकत नव्हता.. पण आजचा दिवस मात्र गोड नव्हता.. कारण आज ती ऑफिस सोडून चालली होती.. ऑफिस सुटल्यावर दुसरीकडे तरी गाठभेट होईलच ह्या आशेवर तो असतानाच त्याला कळले की ती हे शहरच सोडून जाणार होती..

सकाळी सकाळी

लेखक प्रमोद पानसे यांनी बुधवार, 02/01/2019 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
ग्लोबल इंटरनॕशनल स्कुलच्या प्री प्रायमरी सेक्शनच्या गेटवर आज एक नाट्य बघायला मिळालं.मी नेहमी सकाळी कामाला जाताना धवल मधे चहा प्यायला थांबतो .आजही चहा घेत असताना.समोर एक गाडी थांबली.आतुन एक पारोसा झोपाळलेला ,केस विस्कटलेला बाबा त्याचं गोंडस पिल्लु घेउन बाहेर पडला.गुबगुबीत जर्कीनच्या आतलं तेवढंच गोंडस गोरंगोरं बाहुलं बापाच्या गळ्याला मिठी मारुन बसलं होतं.एका खांद्यावर त्या बाहुल्याचं शिक्षण बांधलेली धोपटी आणी दुसर्या खांद्यावर बाहुली असा लवाजमा घेत कसंबसं गाडीचं दार लावुन आणी बाहुल्याची पप्पी घेत गप्पागोष्टी करत बाप शाळेच्या गेटकडे पोहचला.गेटवरच्या वॉचमन कडे सॕक देत बापाने लेकराला खाली उतरवले.चि

आरंभशूर

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 02/01/2019 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
``तूच ठरवतेस, आज व्यायाम सुरू करायचा. आज डायरी लिहायला सुरुवात करायची, आजपासून कामात जास्त लक्ष द्यायचं, टाइमपास करायचा नाही, सोशल मीडिया कमी वापरायचं, व्हर्च्युअल जगात जास्त वावरायचं नाही, सकाळी लवकर उठायचं, माती नि मसणं करायचं!`` ``मग?`` ``मग` काय `मग`? तू मागचापुढचा विचार न करता संकल्पांना होकार देऊन टाकतेस आणि आम्हाला ते पाळत बसावे लागतात ना!``