Skip to main content

लेख

चव

लेखक anandkale यांनी गुरुवार, 28/03/2019 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
सोसायटीत बरीच भटकी मांजरे होती. शाळा सुटल्यावर आलेली मुले त्या मांजरांना खाऊ घाल, त्यांच्या अंगावरून हात फिरव वगैरे खेळ करीत. तसे बघितले तर सर्वच मांजरे लावारीस नव्हती. गुंड्या बोका चिपळूणकरांनी घरात उंदीर झाले म्हणून पाळला होता. पण पट्ठ्याने उंदरांना कधीच तोंड लावले नाही. त्याला पाहून कधी कुठला उंदीर जीव वाचवायला पळून गेलाय असे हि सहसा कुणाच्या दृष्टीस पडले नाही. "गेल्या जन्मी उंदीर होता वाटतं, मेला एक उंदीर धरेल तर शपथ" असे चिपळी (उर्फ मिसेस चिपळूणकर) कधी कधी करवादायची. कोपऱ्यावरच्या इराण्याकडे जातिवंत अल्सेशिअन कुत्रा होता.

पेंटर-कथा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 25/03/2019 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
पेंटर “टेस्ट पॉझिटिव्ह आहे. पोराला स्वाईन फ्लू झाला आहे.’’ डॉक्टर शांतपणे म्हणाले, “फक्त आताशी सुरुवात आहे. बरं केलं, लवकर आणलंत.’’ नवर्याला आवडणार नाही, त्याला राग येईल हे माहिती असूनही शकुंतला पटकन् म्हणाली, “हे नकोच म्हणत होते; पण मलाच राहवलं नाही. म्हणून आणलं तरी.’’ रघूने आपल्या काळ्या-सावळ्याशा, साध्या बायकोकडे रागाने पाहिलंच. त्याला कामाची खोटी होते म्हणून दवाखान्यात यायचंच नव्हतं. बायकोने एकटीनेच पोराला आणलं असतं तर काय झालं असतं, असा विचार त्याच्या डोक्यात होता. पण स्वाईन फ्लू म्हटल्यावर त्यालाही धक्का बसला. रघू एक पेंटर होता. आताही तो त्याच कपड्यात होता.

गंमत - कथा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 21/03/2019 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
गंमत ----------------------------------------------------------------------------------------- “ साप -साप “,… विकेटकिपिंग करणारी गोड ,खोडकर पोरगी एकदमच किंचाळली . पण त्याही क्षणाला तिने सफाईदारपणे बॉल धरला होता ,ज्या बॉलने बॅट्समनला चकवलं होतं . परसामध्ये क्रिकेट खेळणारी सगळीच पोरं दचकली ! “ कुठंय कुठंय ? “ , म्हणत बॅट्समन पुढे गेला . क्रीझ सोडून. त्याबरोबर तिने बॉलने स्टंपस उडवले व ती ओरडली , “ आऊट “ ! सगळीच पोरं ओरडली , “ आऊट “ ! आणि हसायला लागली . त्या खोडकर पोरीने बॅट्समनला बरोबर टोपी घातली होती . तो तिचा भाऊच होता खरं तर. उन्हात खेळून तो आधीच वैतागला होता . घामेजला होता .

जाईजुई

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 19/03/2019 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
जाईजुई रात्रीची वेळ. त्या एकांडया रस्त्यावर , भयाण शांततेत एका तान्ह्या बाळाचे रडणे ऐकू येत होते. ऍक्टिव्हा चालवणारी जाई तो आवाज ऐकून चमकली. वेग हळू करून ती त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागली. तो आवाज बराच पुढून येत होता. शहराचा तो आय टी पार्कचा भाग होता. शनिवारची , रात्रीची वेळ असल्याने तिथे आज कमालीची शांतता होती. तिथे असलेल्या अनेक कंपन्यांच्या राक्षसांसारख्या टोलेजंग इमारतींनी अंधारात ती गजबज जणू गिळून टाकली होती.

सामाजिक उपक्रम -२०१९

लेखक निशदे यांनी सोमवार, 18/03/2019 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सामाजिक उपक्रमाचे हे आपले दहावे वर्ष. मित्रपरिवाराच्या आणि साथीने गेली ९ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. उपक्रमाविषयी थोडेसे: माझ्यासह सुमारे ७-८ स्वयंसेवक दरवर्षी एक सामाजिक उपक्रम चालवितात. महाराष्ट्रातील ज्या सामाजिक संस्थांना सरकारकडून कमी मदत मिळते(अथवा मिळतच नाही) किंवा ज्या संस्था मुख्यत्वे देणगीदारांवरच चालतात अशा गरजू संस्थांना मदत मिळवून देण्याचा हा उपक्रम आहे. यावर्षी या उपक्रमाचे दहावे वर्ष आहे.

सुधारीत जीवनशैलीच्या शोधात....

लेखक प्रभाकर पेठकर यांनी शुक्रवार, 15/03/2019 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
स्वच्छंदी जीवनाची परिणिती, वाढत्या वयाबरोबर रोज नविन दुखण्याचा शोध किंवा नविन समस्या उद्भवल्या नाहीत तर जुन्याच समस्या तिव्रतेने जाणवण्यात होते. ऐन तारूण्यातली जागरणं, अरबट चरबट आणि वेळी अवेळी खाणं त्या त्या वेळी खुप सुखाऊन गेली. पण पन्नाशी नंतर कांही शारीरिक कुरबुरी सुरू झाल्या. तसं गंभीर कांही नव्हतं पण थकवा जाणवायचा म्हणून एकदा डॉक्टरांच्या दवाखान्याची पायरी चढलोच. म्हंटलं कांही तरी मल्टीव्हिटॅमिन वगैरे देतील थोड्या दिवसांकरीता आणि सर्व ठीक होईल.

पाणी आंदोलन

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/03/2019 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे या लेखात सटाणा शहराचा विचार केला असला तरी सर्वदूरच्या (महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र) वाचकांनी सटाणा हे शहर उदाहरणार्थ म्हणून समजावं. ज्यांनी दूरदृष्टीने जल व्यवस्थापन केलं नाही अशा सर्व गाव- शहरांत कमी अधिक प्रमाणात या वर्षी पाणी टंचाईची अशीच भीषण अवस्था आहे : सटाणा शहराचा पाणी प्रश्न तीस- चाळीस वर्षांपासून तसाच टांगणीला पडला आहे. ‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या वाक्प्रतचारासारखं सटाण्याचं झालं आहे. पाणी टंचाई झाली की बोलायचं. नदीला आवर्तन सुटलं की आपल्यापुढे पाण्याचा प्रश्नच नाही असं वागायचं. जमिनीत बोरवेल करून जो तो आपापला पाणी प्रश्न सोडवू पाहतो.

झगमगाटातील अस्वस्थता....

लेखक प्रभाकर पेठकर यांनी गुरुवार, 14/03/2019 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
एक जोरदार आळस देऊन मी उठलो. भ्रमणध्वनीवर 'ओला' निरोप पावला. Driver Saroj is reaching your address. 'सरोज? ओलाने लेडी ड्रायव्हर पाठवला की काय?' क्षणभर सुखावलेल्या माझ्या मनाला चालकाच्या तपशिलात छायाचित्र दिसले जे बाप्याचे होते. म्हंटले 'असो.' सामानाची बॅग उचलली आणि खाली आलो. चालक वाट पाहात होता. डिकीत (भारतात हाच शब्द प्रचलित आहे) बॅग ठेवली आणि पासपोर्ट, तिकिट थोडेफार भारतिय आणि ओमानचे चलन असलेला महत्वाचा चामड्याचा कसा उर्फ 'पाऊच' घेऊन मी चालकाशेजारी बसलो. परदेश प्रवास, विमान प्रवास तसा आता मला नविन नव्हताच.

जाब

लेखक मित्रहो यांनी रविवार, 10/03/2019 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
जाब "ब्रुटस दाउ टू, ब्रुटस दाउ टू" तो जिकडे जात होता तिकडे हेच ऐकत होता. तो कान बंद करीत होता तरी ते आवाज त्याच्या कानात घुमत होते. तो या आवाजापासून जितका दूर पळत होता तितका तो आवाज त्याचा पाठलाग करीत होता. रस्त्यावरच्या गर्दीत मिसळला तर रस्त्यावरच्या गोंधळातही तो आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. तो दूर गुफेत जाउन लपला तर तिथेही आवाज त्याच्या मागे येत होता. तो चिडला, वैतागला. त्याने जाब विचारायचे ठरविले. तो पळत निघाला. तो पळत होता. कितीतरी दिवस नुसता पळत होता. तो पळत पळत शेकडो मैल दूर आला. रोम खूप मागे राहीले होते. तो इंग्लंडमधील स्ट्रॅटफोर्ड या गावी आला. तो तिथे ट्रिनिटी चर्चपाशी गेला.

Women 's Day - 2019

लेखक माउ यांनी शनिवार, 09/03/2019 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळीनो ! काल ' जागतिक महिला दिन' (International Women 's Day ) झाला. सगळ्या महिलांनी एकमेकीना शुभेच्छा दिल्या. ज्या working आहेत, त्यांनी छान Day Out त्यांचा enjoy केला. बऱ्याच पुरुषांनी त्यांच्या मुलीना,आई ला, बायकोला, मैत्रिणी ना, girlfriend ला वेगवेगळ्या पद्धतीने wish केले. Such a kind gesture! परत Men - Women Equality, women and their rights ह्या सगळ्या विषयांवर चर्चा झाल्या ofcourse on different platforms .. मी स्वतः एक स्त्री आहे पण मुळात मला ह्या Women 's Day celebration वर थोडासा आक्षेप आहे.