Skip to main content

व्यसनमुक्ती

अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे - अनिल अवचट

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 19/04/2020 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
'अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे' अनिल अवचट प्रास्ताविक- (अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र – डिसेंबर 1995 मध्ये ही अनिल अवचटांची मुलाखत प्रकाशित झाली होती. मुलाखत घेणारे दोघेही माझे अंनिस चळवळीतील हितचिंतक आहेत. 2019 मधे म्हणजे मागील वर्षी या मुलाखतीच्या अनुषंगाने अवचटांशी गप्पा मारायला गेलो होतो. त्यांना या मुलाखतीची प्रत दिली व 24 वर्षांच्या कालावधीनंतर आपल्याला यात काही बदल करावासा वाटतो का? आपल्या विचारांच्या छटेत काही बदल करावा वाटतो का? हे अजमावणे हा हेतु बाळगून मी आलेलो आहे असे सुरवातीलाच सांगितले.