Skip to main content

वंशभेद

भारतातील आफ्रीकन विद्यार्थ्यांचा प्रश्न

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 04/02/2016 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
आफ्रीकेतील बर्‍याच देशातील विद्यार्थी कायदा पालन विषयक समस्यांसाठी ओळखले जातात (सर्वच तसे असतील असे नव्हे). अलिअडच्या काळात दिल्ली, गोवा, इथे काही घटना घडून गेल्या यावेळी बेंगलोरची वेळ आहे. या वेळच्या बेंगलोर केस मध्ये एका सुदानी विद्यार्थ्याच्या गाडीखाली येऊन एका बेंगलोरच्या स्त्रीस अपघात झाला. स्थानिक जमावाने चिडून अपघाताशी संबंध नसलेल्या तांझानीयन विद्यार्थ्यांची गाडी अडवून जाळली आणि कार मधील तांझानीयन विद्यार्थ्यांंचे हाल करून वड्याचे तेल वांग्यावर काढले.