Skip to main content

विरंगुळा

लाॅकडाऊन : चाैथा दिवस

लेखक गणपा यांनी शनिवार, 28/03/2020 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस चाैथा. काय मंडळी? कसे आहात? घरात बसताय ना? बसायलाच पाहिजे. आज जरी देशासाठी लाॅकडाऊनचा चाैथा दिवस असला तरी आमचा सहावा दिवस आहे. गेल्या आठवड्यात गावी गेलेलो, अन अचानक रविवारी जनता कर्फ्यु लागला. काही महत्वाच्या कामांमुळे परत येणं भाग होतं. सोमवारी पहाटे पाचला कर्फ्यु संपताच परत निघालो. रस्ते तसे मोकळेच होते. नेहमीपेक्षा अर्धातास लवकरच घरी पोहोचलो. 11च्या सुमारास कामासाठी स्टेशनवर गेलो तर तिथे पोलिसांनी रोड ब्लाॅक केलेले. शहरातुन बाहेर पडण्याचे आत येण्याचे मार्ग पोलिसांनी रोखुन ठेवलेले. नशीब तेव्हा पोलिसांना फ्री हँड दिला नव्हता. हाडं शाबुत राखुन माघारी फिरलो.