Skip to main content

विमान

येती एअरलाइन्स फ्लाइट ६९१. अ क्रॅश इन कॅव्हॉक ..

लेखक गवि यांनी मंगळवार, 17/01/2023 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
कॅव्हॉक हा शब्द पायलट्स अगदी रोजच्या बोलण्यात वापरतात. त्याचा अर्थ आहे सीलिंग अँड व्हिजिबिलिटी ओके. नेपाळच्या पोखरा एअरपोर्ट वर अगदी उतरता उतरता एक एटीआर ७२ विमान क्रॅश झालं आहे. तर अत्यंत स्वच्छ अशा cavok हवामानात हे विमान क्रॅश झालं आहे. A इमेज आभार wikimedia / wikipedia विमानांच्या उड्डाणासाठी आणि एकूण मार्गाचं प्लॅनिंग करण्यासाठी जी माहिती लागते त्यातला महत्वाचा भाग म्हणजे मेटार (METAR). याचा अर्थ मेटरॉलॉजिकल टर्मिनल एअर रिपोर्ट.