Skip to main content

television serials

कोण होईल करोडपती --सूत्रसंचालक कोण ?

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 01/07/2016 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
कलर्स मराठीवर सध्या 'कोण होईल करोडपती' ची जाहिरात दिसू लागलीये. येत्या मौसमात सूत्रसंचालक कोण असेल ते जाहिरातीत दाखवत नाहीयेत. त्यांचा सूत्रसंचालक ठरला/ली आहे की नाही माहीत नाही. पण मिपाकरांच्या मते कोण योग्य सूत्रसंचालक होवू शकतो हे जाणून घ्यायला आवडेल. माझ्या मते मागच्या मौसमात 'सचिन खेडेकर'ला घेवून सूत्रसंचालन पूचाट झाले होते. कोण योग्य सूत्रसंचालक असू शकेल याचा विचार करत असताना मला सूचली ती ही नावे...