Skip to main content

तत्व

ज्याचा त्याचा समाजवाद

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 08/02/2025 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
समाजवादी याचा काल सुसंगत व व्यापक अर्थ असा की आपण ज्या समाजात राहतो त्याचे काही देण लागतो या दृष्टीने आपल्या कुवतीनुसार समाज उन्नती साठी शक्य असेल ते काम करणे. स्वत:चा विकास करताना सोबत समाजाचाही विकास व्हावा या दृष्टीने काही योगदान देता आले तर ते पाहणे. व्यवहारिक दृष्ट्या स्वार्थ व परमार्थ दोन्ही कसा साधता येईल हे पहाणे. व्यक्तिगत पातळीवर समाजहिताचे व्यापक काम करताना अनेक मर्यादा येतात. त्यामुळॆ संघटनात्मक पातळीवर देखील हे काम केले जाते. एनजीओ, चळवळी, ट्र्स्ट अशा समाजसेवी संस्थांच्या मार्फत हे काम होत असते.