डेकोरम

ट्रम्प तात्या ह्यांचा अमेरिकन विलेक्शन मध्ये दारुण पराभव झाला. अर्थांत दारुण हे विशेषण इथे अनावश्यक होते पण तात्यांच्या हेकेखोर आणि असंतुलित व्यवहाराने तो पराभव दारुण ह्याच श्रेणीत गेला. तात्यांनी इलेक्शन तर घालवलेच पण रुडी सारख्या अतिवृद्ध आणि थकल्या वकिलाच्या नादी लागून सर्वत्र आपली शोभा वारंवार करून घेतली. तात्यांच्या नादात सिनेट सुद्धा रिपब्लिकन लोकांच्या हातून गेली. तात्यां कडून बरीच अपेक्षा होती. त्यामानाने अनेक ठिकाणी त्यांचे अंदाज खूप बरोबर होते. उत्तर कोरिया बरोबर आणि इराण बरोबर त्यांनी युद्ध तर टाळलेच पण इराण ला जिथे हवा होता तेंव्हा हिसका सुद्धा दाखवला.
Subscribe to ट्रम्प तात्या