वृद्ध आईसाठी ठाण्यात देखभालीसाठी माहिती हवी आहे
नमस्कार,
मी मि. पा. वर नवीन आहे. मला माझ्या एका वयक्तिक समस्येवर आपणां सर्वांकडून मदत / माहिती हवी आहे.
मी गेली काही वर्षे अमेरिकेत स्थायिक असून, माझी आई ठाण्याला मोठ्या बहिणीकडे राहते. आईचे वय ७८ वर्षे तर बहिण ५४ वर्षे. आत्तापर्यंत आईची सर्व काळजी, बहिणीने घेतली - आजारपण, रुग्णालयात भरती, वगैरे सर्व काही.
सध्या, आई जवळपास अंथरुणावर आहे. गुढघे झिजल्यामुळे, पाऊल नीट पडत नाही व बरेच वर्ष औषधांवर असल्यामुळे, पोटाचा त्रास, बेचैनी असते.
डॉक्टर knee replacement करायला सांगत आहेत, पण या वयात इतर तब्बेत बघता झेपेल की नाही हि शंकाच आहे.
मिसळपाव