Skip to main content

सुशिक्षित अडाणी

सुशिक्षित अडाणी की अशिक्षित तारतम्य....

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 20/01/2021 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी एक कथा वाचली होती. एका गावात चार हुषार विद्यार्थी रहात असतात.पुढील शिक्षण घेण्यासाठी, ते एका गुरू कडे जायचे ठरवतात.हाताशी, एखादा स्वयंपाकी असावा, म्हणून ते गावातीलच एका माणसाला बरोबर घेतात. चौघेही विद्यार्थी, गुरूकडून शिक्षण पुर्ण करून गावी येत असतात, बरोबर स्वयंपाकी असतोच. वाटेत, त्यांना एका प्राण्याची हाडे मिळतात.