Skip to main content

सुरक्षा संवेदनशीलता

सेफ्टी क्रिटिकल - सुरक्षा संवेदनशीलता

लेखक साहना यांनी गुरुवार, 08/06/2023 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
Safety Critical Systems म्हणजे सुरक्षा संवेदनशील यंत्रणा. इथे चूक झाली तर लोकांचा जीव जाऊ शकतो किंवा प्रचंड प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होऊ शकते. विमान यंत्रणा, ऍटोमिक रिऍक्टर, रेल्वे यंत्रणा, ट्राफिक सिग्नल बँकिंग यंत्रणा (काही प्रमाणांत), मेडिकल उपकरणे, औषधे, अत्याधुनिक शस्रास्रे हि सर्व ह्या प्रकारांत मोडतात. फेसबुक, गुगल सर्च, आधार कार्ड ह्या गोष्टी ह्यात येत नाहीत. गुगल काही तास बंद पडले म्हणून काही कुणी मरत नाही पण विमानाचे इंजिन बंद पडले किंवा ट्राफिक सिग्नल दोन्ही बाजूला हिरवा झाला तर काही लोकांना तात्काळ मृत्यू होऊ शकतो.