संत एकनाथांचा प्रतिमा आणि मुर्ती पुजन विषयक दृष्टीकोण
संत एकनाथांच्या अभंगामध्ये प्रतिमा पुजा अथवा मुर्तीपुजा विषयी त्यांची मते व्यक्त झाली असावीत. संत एकनाथ खालील एका अभंगातून काही टिकाही करताना दिसतात तर एकनाथी भागवतात बर्याच ठिकाणी मुर्तीपुजेचे समर्थन आणि साद्यंत वर्णन करत असावेत. त्यांच्या संबंधीत अभंगांचे सरळ गद्य अनुवाद आणि या निमीत्ताने त्यांच्या मुर्तीपुजा विषयीच्या मतांना समजून घेण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा आहे.
यातील बहुतांश अभंग मी मराठी विकिस्रोतावरून घेतले आहेत अद्याप ज्याचे मुद्रित शोधन बाकी असावे (चुभूदेघे). संत एकनाथांच्या मूळ साहित्यासोबत त्यात कुठे त्रुटी आढळल्यास मराठी विकिस्रोत प्रकल्पात आपल्या साहाय्याचे स्वागत असेल.
मिसळपाव