Skip to main content

संरक्षण

तरंगत्या विमानतळाची कहाणी

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 03/09/2022 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
Vikrant स्वदेशात प्रथमच बांधण्यात आलेल्या विमानवाहू जहाजाचे (विक्रांत) येत्या 2 सप्टेंबरला कोची इथं भारतीय नौदलात सामिलीकरण होत आहे. कोचीतल्या गोदीमध्येच या जहाजाची बांधणी करण्यात आलेली आहे. देशाने जहाजबांधणीच्या क्षेत्रात गाठलेला हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

अरबी समुद्रावर टेहळणी

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 03/04/2022 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय नौदलाच्या हवाई शाखेत नव्या तुकडीचा – आयएनएएस 316 (INAS 316) समावेश गेल्या 29 मार्चला करण्यात आला आहे. या तुकडीत सागरी टेहळणी करणाऱ्या P-8I या दीर्घपल्ल्याच्या विमानांचा समावेश आहे. गोव्यात दाभोलिममध्ये असलेल्या नौदलाच्या हवाईतळावर (आयएनएस हंसा) ही तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे अरबी समुद्राची अधिक प्रभावीपणे टेहळणी करणे शक्य झाले आहे. भारतीय नौदलात सध्या एकूण 12 P-8I विमाने सामील करण्यात आलेली आहेत. किनाऱ्यापासून दूरपर्यंत उड्डाण करून टेहळणी करण्याची क्षमता असलेले P-8I विमान पाणबुडीविरोधी अत्याधुनिक युद्धप्रणालीने सज्ज आहे.

विशाखापट्टणम’ : अत्याधुनिक आणि शक्तिशाली

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 20/11/2021 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या 21 नोव्हेंबरला मुंबईतील माझगाव गोदीत बांधण्यात आलेली ‘भा. नौ. पो. विशाखापट्टणम’ (आय.एन.एस. विशाखापट्टणम) ही स्वदेशी अत्याधुनिक स्टेल्थ विनाशिका भारतीय नौदलात सामील होत आहे. ती भारतीय नौदलातील आतापर्यंतची सर्वात अत्याधुनिक, सर्वात मोठी आणि हिंदी महासागरातील सर्वांत शक्तिशाली विनाशिका ठरणार आहे. ही विनाशिका भारताच्या आणि भारतीय नौदलाच्या तांत्रिक, सामरिक, कौशल्यात्मक ताकदीचे प्रतीक बनणार आहे. भारताने आपल्या नौदलाची त्रिमितीय शक्ती वाढवण्यासाठी 1990च्या दशकापासूनच विविध प्रकल्प हाती घेतले. ‘प्रोजेक्ट-15 बी’ असाच एक प्रकल्प.