Skip to main content

संमेलन

मराठीप्रेमी पालक महासंमेलन

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 27/11/2017 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
या सविनय नमस्कार, मातृभाषा शिक्षणाचं जगभर निर्विवाद सिद्ध झालेलं महत्व, महाराष्ट्रातील मराठी शाळांचं संवर्धन, पालकांच्या मनातील समज-गैरसमज, शासनाची धोरणं, शिक्षकांची तळमळ आणि कोंडी, पालकांची संभ्रमावस्था, मुलांवरचा ताण, इंग्रजी भाषा व इंग्रजी माध्यम अशा अनेक विषयांना धरून, मोठ्या प्रमाणावर पालकांचं, शिक्षकांचं आणि शाळांचंही एक महासंमेलन मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित केलेलं आहे.

"कुत्र्याला खीर पचली नाही"

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 18/01/2016 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीपाल सबनीस हे नाव मी त्यांची यंदाचे साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली तेव्हा प्रथमच वाचले. "हे सबनीस कोण?" असा प्रश्नही अनेकांकडून उघड ऐकला. श्रीपाल सबनीस यांचे निकटवर्तीय (पण बहुतेक आता दुरावलेले) पत्रकार घनश्याम पाटील यांनी "कुत्र्याला खीर पचली नाही" या शीर्षकाचा एक लेख लिहून सबनीस यांच्या उरल्यासुरल्या अब्रूची लक्तरे चव्हाट्यावर टांगली आहेत. साहित्यजगतात इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण होत असेल आणि ते निर्लज्जपणाने करणारी व्यक्ती संमेलनाध्यक्षपदापर्यंत पोचत असेल यावर चटकन विश्वास बसत नाही. सदर लेख आंतरजालावर सहज उपलब्ध आहे. परंतु भ्रमणध्वनी हस्तसंचावरून दुवा डकवणे कठीण जात आहे.