Skip to main content

संगीत

पंचमदाच्या गाण्यांवरून घेतलेली चित्रपटांची नावे

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 13/04/2020 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
करोना लॉकडाऊनमुळे मिपाकरांजवळ चिकार मोकळा वेळ असणार असे गृहीत धरून ही किंचितचर्चा सुरू करत आहे. प्रतिसादांतून ती पुढे न्यावी ही विनंती. ******* पंचम (आर डी बर्मन)चे समकालीन असलेले लक्ष्मीकांत- प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, राजेश रोशन, बप्पी लाहिरी हे (मोजकी काही गाणी वगळता) बरेचसे विस्मृतीत गेलेले आहेत. इतकेच काय, नंतरच्या जमान्यातील आनंद- मिलिंद, नदीम- श्रवण, आदेश श्रीवास्तव यांच्याशीही नव्या पिढीचे फार नाते जुळताना दिसत नाही (जतिन ललित आणि ए आर रहमान हे काहीसे अपवाद). पंचमची असंख्य गाणी मात्र आजही आवडीने ऐकली जातात. आजच्या पिढीलाही ती कालबाह्य वाटत नाहीत.

सवाई संगीत महोत्सव हा सांस्कृतिक दहशतवाद?

लेखक दासबोध.कॊम यांनी शुक्रवार, 22/12/2017 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
(आपल्या संगीतप्रेमी मित्रांना खालील पुरावे अवश्य वाचावयास द्या!) सवाई महोत्सव हा सांस्कृतिक दहशतवाद- इति मंबाजी बीग्रेड (संगीत, अर्थात पंधरावे महापातक) नुकताच पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात, आनंदात पार पडला. या आनंदात विरजण पाडायचे काम संभाजी महाराजांचे नाव घेऊन चालविल्या जाणा-या एका टोळीने केले. त्याचा परिणाम असा होऊ शकतो की रसीक श्रोते मराठा समाजाला नावे ठेऊ शकतात, तसे झाले तर तो आपल्या शत्रूचा विजय ठरेल. तसा तो ठरू नये म्हणून हा लेखन प्रपंच. समर्थ रामदास मोठेच संगीत प्रेमी! आजही हिंदुस्थानी शास्त्रीय संगितात रामदासी मल्हार इ.