Skip to main content

शहरीकरण आणि स्मार्ट सिटी

कसलं उकडतंय ना!

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 13/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
आज आम्ही चार जण बोलत असताना एक जण अगदी असं कसंनुसं होत घाम पुसत 'कसलं उकडतंय ना!!' असं म्हणाला. तापमान खरंच प्रचंड वाढलंय एकंदर. त्याचे परिणामही दिसतायतच. तेंव्हा विचार आले मनात, की साला उकडतं उकडतं म्हणत आपण सगळेच तक्रार करतोय... हे होतंय आपल्यामुळेच. बरं तेही आपल्याला माहिती आहे, तशी पकपक आपण सोशल मिडियावर करत असतोच की. पण, आपण झाडं लावतो, किंवा ती तोडली जाऊ नयेत म्हणून काही करतो? नाही. आपण पाणी वाचवतो? नाही. आपण एसी वापरणं कमी करतो? नाही. आपण गाड्या वापरणं कमी करतो? नाही. आपल्याला शहरं हवीत? हो. प्रगती हवी? हो. मॉल, टॉवर हवेत? हो. तथाकथित लॅव्हिश लाईफ हवं? हो. जंगलं हवीत?

चाक उलटे फिरवावे का ?

लेखक नितीनचंद्र यांनी सोमवार, 01/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा कुठल्याश्या वाहिनीवर स्मार्ट सिटी विषयक चर्चा चालु होती. सहभागात काँग्रेसचे नेते भाई जगताप, विवेक वेलणकर आणि शहररचनाकार महाजन मॅडम होत्या. महाजन मॅडम सांगत होत्या की स्मार्ट सिटी घडवायची असेल तर सुरवातीला पायलट प्रोजेक्ट करायला हवा. तो सुध्दा पुण्यातल्या औंध, सकाळनगर, बावधन, पाषाण भागात कारण हे नविन पुणे आहे जे नगररचने नुसाल वसवले गेले आहे ज्यात मुळातल्या समस्या कमी आहेत. पाच वर्षांत याची फळे दिसतील आणि मग ती इतर भागात कॉपी करता येतील. विवेक वेलणकर म्हणाले की मग अश्या रितीने सर्व शहरे स्मार्ट होण्यासाठी कदाचित ५० वर्षे लागतील हे काही बरोबर नाही.