Skip to main content

शहरी समस्या

काही समस्या

लेखक Nitin Palkar यांनी मंगळवार, 09/07/2019 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुढील व्यथांवर प्रभावी, हुकमी उपाय कुणी सुचवू शकेल का....? मुंबई शहर आणि त्याच्या उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांनी मांडलेला उच्छाद, त्यांना रस्त्यात दूध बिस्किटे घालणाऱ्या काही भूतदया संस्था, घरातल्या शिळ्या चपात्या त्यांना रस्त्यातच घालणारे दयावान श्वानप्रेमी. जागोजागी कबुतरांना दाणे घालणारे पक्षीप्रेमी. अनेक मंदिरांच्या बाजूला गायींना घेऊन बसणाऱ्या, त्यांच्याकरता चारा आणि कसलेसे लाडू विकणाऱ्या बाया. या गायींचे मलमूत्र परिसरात करत असलेली घाण. या समस्यांचा सर्वांनाच त्रास होत असावा, यावर काय इलाज करता येईल?