Skip to main content

सामान्य चर्चा

..........पण

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी गुरुवार, 25/05/2017 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
" पण"" हा शब्द पुरातन काळापासून वापरात आहे. पण म्हणजे प्रतिज्ञा , विवाहात योग्य निवडीसाठी वापरण्यात आलेली कृती वगैरे . तसेच त्याचे इतरही अर्थ होत असतील. जसे , जुगारात मिळकत अथवा व्यक्ती पणास लावणे, पणात एखादी वस्तू जिंकणे अथवा हरणे, इ. परंतु माझ्या मते पण हा पूर्वी काही प्रमाणात तरी (चांगल्या वाईटाचे प्रमाण माहीत नाही) चांगल्या कर्मांसाठी वापरला जात असे. असे दिसते. म्हणजे विवाहासाठी द्रौपदीने पण लावला. आणखीनही काही उदाहरणे देता येतील. वाईट कामांसाठीही पण केले जात असतील. असा हा पण आजच्या युगातही घट्ट रुजलेला आहे. मात्र आता पण वापरला जातो तो नकारात्मक गोष्टींसाठी.