इजिप्त एयरलाइन्सचे विमान
माझ्या मामाचं पत्र हरवलं, आम्हाला नाही सापडलं!
लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी हा खेळ खेळला असणार. पण आज या खेळाची आठवण आली ती कालच्या दुर्दैवी घटनेमुळे. इजिप्त एयरलाइन्सचं पॅरिसहून कैरोला निघालेलं विमान भूमध्य समुद्रात अचानक गायब झालं. ग्रीस एयर ट्रॅफिक कंट्रोलचं म्हणणं आहे की ग्रीसच्या एयरस्पेस मधून केवळ १० मैल दूर गेल्यावर विमानाचा रडारसोबत संपर्क तुटला. हे विमान अदृश्य झाले नसते तर त्या वेळेनंतर अवघ्या काही मिनिटात कैरोला पोहोचणार होते. उड्डाणाच्या सुरुवातीपासून तर ग्रीक एयरस्पेस सोडेपर्यंत कोठेही काहिही संशयास्पद नव्हतं.
मिसळपाव