Skip to main content

शब्द का नाहीसे होतात

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 08/01/2016 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
गाभा माझा एक मित्र डेहराडूनचा आहे, हिंदी साहीत्य वगेरे वाचनाऱ्यांपैकी आहे. पार्टीमधे त्याच्या तोंडून कवि निरज किंवा कवि प्रदीप यांच्या कविता ऐकने म्हणजे एक मेजवाणीच असते. एकदा सहज गप्पा मारीत असताना तो म्हणाला “हमारे भैय्या डेहराडूनमे अध्यापक है.” त्यातला अध्यापक हा शब्द चांगलाच लक्षात राहीला कारण हल्ली हा शब्द कोणी वापरीत नाही. हल्लीच्या टीचर, प्रोफसर च्या जमान्यात कुणी अध्यापक असे म्हणतच नाही. हाच नाही तर असे कितीतरी शब्द जे एकेकाळी वापरात होते ते आज नाहीसे झाले. एका मुलाखतीत प्रसून जोशीने म्हटले की हल्लीच्या वाचकांची शब्दसंपदा कमी झाली आहे.

आडनावे, पूर्ण नावे, लेखक आणि साहित्यिकांचे वंशजांचा शोध

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 08/09/2015 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही यात विकिपीडियाला कशी मदत करू शकता ? १) एखाद्या आडनावाला लेखक असेल तर त्या आडनावाचा मराठी विकिपीडियावर लेख चालू करून, संबधीत आडनाव लेखात लेखकाचे नाव नोंदवणे. अशा आडनाव विषयक लेखांचे मराठी विकिपीडियावर [[वर्ग:मराठी आडनावे]] या वर्गाने वर्गीकरण केले जाते.

समर्थ रामदास लिखीत धवल गीताच्या अनुवादात साहाय्य हवे, आणि सुद्धा धवळे/धवले आडनावांची माहिती हवी

लेखक माहितगार यांनी रविवार, 12/07/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
धवले/धवळे/ धवलगीत हि प्राचीन महाराष्ट्रातील विवाहप्रसंगी गायल्या जाणार्‍या लोकगीतांची लूप्त होत गेलेली एक परंपरा होती. या परंपरेचे अवशेष आता आगरी समाज आणि इतर काही छोट्या समाजगटातून शिल्लक असावेत. धवळे गीत प्रकारात संतांनी सुद्धा लेखन केले त्यात समर्थ रामदास लिखीत एक काव्य दिसते आहे.

चक्रवर्ती अशोक सम्राट (कलर्स मालीका)

लेखक माहितगार यांनी बुधवार, 08/07/2015 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या कलर्स नावाच्या दूरचित्रवाणीवर चक्रवर्ती अशोक सम्राट (टेक्स्ट अपडेट) नावाची धारावाहीक मालीका चालू आहे. (मी स्वतः दूरचित्रवाणी मालीकांचा फारसा पंखा नाही तरीही गेल्या चार एक महिन्यांपासून हि मालीका पाहतो आहे). मालीकेत कुमार वयातील अशोक एका चतुर आणि गुणी युवकाच्या रुपात उभा केला गेला आहे कुमार अशोकची आई सुद्धा जीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी अशी आदर्श माता दाखवली आहे.