Skip to main content

रशिया

युक्रेनमधला पेचप्रसंग

लेखक गामा पैलवान यांनी शुक्रवार, 25/03/2022 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, बऱ्याच दिवसांपासनं युक्रेन व रशिया यांतल्या घडामोडींवर लिहायचं मनात होतं. पण अंगभूत आळशीपणा आडवा आला. शेवटी आता ठरवलंच की लिहूया म्हणून. तर, हा लेख रशियाच्या परिप्रेक्ष्यातनं लिहिलेला आहे. ही जी दुसरी बाजू आहे ती तितक्याशा ठळकपणे समोर आलेली नाहीये. ती यावी यासाठी हा दृष्टीकोन उलगडून सांगायचा माझा प्रयत्न आहे. --------------x--------------x-------------- थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी : त्याचं असं झालं की, लेक, चेक आणि रस असे ते तीन भाऊ होते. लेक ( Lech ) पासनं पोलंड उत्पन्न झालं. चेक ( Czech ) पासनं चेक राष्ट्र बनलं. तर रस ( Rus ) पासनं रशिया बनला.