मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रिअॅलिटी शो

रिअॅलिटी शो म्हणजे भंपकगिरी

पी महेश००७ ·
इंडियाज गॉट टॅलेंट आणि सारेगामा या दोन कार्यक्रमांची अंतिम फेरी (त्यांच्या भाषेत ग्रँड फिनाले) पाहण्याचा योग आला. तसेही या कार्यक्रमांचे अनेक भाग मी पाहिले होतेच. पण अंतिम निकालाने घोर निराशा केली. झालं काय, की इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये पपया व अंकिता (ही दोघेही गरीब घरातील आहेत हा भाग अलाहिदा) यांचे अप्रतिम सादरीकरण झाले. त्यांच्या स्पर्धेत सुलतान हा बासरीवादक होता. त्याचे बासरीवादनही अप्रतिमच. त्यात दुमत नाही. पण पपया व अंकिता यांच्या नृत्यात इतके स्टंट होते, की ते अभावानेच कोणी केले असतील. बासरीवादन आणि त्यांच्या नृत्यातल्या नजाकत दोन्हीही सुरेखच.