उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक-२०१७ मतमोजणीपूर्व धागा
नमस्कार मंडळी,
पुढच्या शनीवारी म्हणजे ११ मार्चला ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी होणार आहे. शक्यतो मी मतमोजणीपूर्व धागा २-३ दिवस आधी लिहितो पण बुधवारी आणि गुरूवारी तो धागा लिहिण्यासाठी लागणारा एकसलग वेळ मिळेलच याची खात्री नसल्यामुळे आताच लिहित आहे. या धाग्यात सुरवातीला विधानसभा निवडणुकांमध्ये काय होईल याविषयी माझे मत व्यक्त करून या निकालांमुळे देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल यावर भाष्य करणार आहे.
उत्तर प्रदेश (जागा: ४०३)
उत्तर प्रदेशात भाजप विरूध्द सप-काँग्रेस आघाडी विरूध्द बसप अशी तिरंगी लढत आहे.
मिसळपाव