Skip to main content

प्रवास सुविधा

ओला, उबेर आणि खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या पन्क्चुअल / रिलायेबल आहेत का ?

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 17/12/2018 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुण्यनगरीस जाणे झाले होते. एकटीच असल्यामुळे निवांत बसने जायचे ठरले. धनकवडीत मुलगा आहे. सकाळी अकरा वाजता त्याच्यासोबत नाष्टा झाल्यावर बारापर्यंत त्याच्यासह बावधनला बहिणीकडे जायचे होते. मुलाने उबेर टॅक्सी ऑनलाईन बघितली. ३०० रु. रेट आला. ओलाचा १८०. ओला कॉल केली असता ५ ते १० मिनिटात येईल असे समजले. आम्ही भारती हॉस्पिटलच्या मागे चैतन्यनगर या भागात होतो. वीस मिनिटे झाली तरी टॅक्सीचा पत्ता नाही म्हणून ड्रायव्हरला कॉल लावला. तो याच भागात असून आम्ही होतो तो रस्ता त्याला सापडत नाही असे समजले. वास्तविक पाहता गूगल लोकेशन दिलेले असताना रस्ता सापडत नाही हे विचित्र आहे. पुन्हा पत्ता नीट सांगितला .