Skip to main content

प्रगल्भता

सोनार..शिंपी...

लेखक dadabhau यांनी शुक्रवार, 19/04/2024 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
Youtube जेव्हा ही "सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा , यांची संगत नको रे बाप्पा " हे गाणे बघतो तेव्हा वाटते की फार नाही ३० वर्षांपूर्वी सामान्य जनता किती प्रगल्भ होती ! आजच्या फुसक्या भावनोन्मादाच्या जमान्यात जिथे जातीचे नाव घेणे ही पाप मानवे लागेल....( पण सगळ्या सरकारी कामांसाठी मात्र जात लिहीणे बंधनकारक !) असे गाणे कुणी बनवूच शकणार नाही. कुणी बनवलेच तर त्याचा मराठी सलमान रश्दीच होईल. खरंच समाज इतका असहिष्णू का झाला असावा? ह्या गाण्यात जी म्हणवापरलीये ती कशी उत्पन्न झाली असेल? म्हणी सार्वकालीन सत्य असतात का?