Skip to main content

पंच्याहत्तरावा स्मृतिदिन

जग में रह जाएंगे, प्यारे तेरे बोल"- स्वर्गीय कुंदनलाल सैगल

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 18/01/2022 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
जग में रह जाएंगे, प्यारे तेरे बोल"- स्वर्गीय कुंदनलाल सैगल "Age is just a number. It carries no weight. The real weight is in impacts". ही उक्ती बऱ्याच लोकांना लागू पडते मग ते कुठल्याही क्षेत्रातील आसू द्यात. बालकवी ठोंबरे(२७ वर्षे आयुष्य) ,कवी दत्त अल्पायुषी कवी, लवकरच काळाच्या पडद्याआड गेले पण आजही त्यांच्या कवीता जन मानसात घर करून आहेत. दत्तात्रय कोडों घाटे उर्फ कवी दत्त (२४ वर्षे आयुष्य) यांची एक कवीता "नीज नीज माझ्या बाळा, रवी गेला रे सोडूनी आकाशाला", आईने लहानपणी आपल्याला झोपी घालताना म्हटल्यांचे कित्येक जणाना आठवत असेल.