Skip to main content

पेशवा बाजीराव मालिका

सोनी टीव्ही: पेशवा बाजीराव मालिका

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 24/01/2017 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
सोनी TV वर हिंदीतून २३ जानेवारी २०१७ पासून रोज (सोम-शुक्र) संध्याकाळी ७:३० वाजता भव्य दिव्य "पेशवा बाजीराव" मालिका सुरु झाली आहे. पहिला एपिसोड मी बघितला. एका तासाचा होता. मला खूप आवडला. एखादा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट बघतोय असेच वाटत होते. उत्तम आणि श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत. कलाकारांचा अभिनय छान वाटला. एडिटिंग टाईट आहे. कथा रेंगाळत नाही! यात घटना खूप नाटकीय पद्धतीने पेश केल्या आहेत तरीही त्यामुळेच बघायला इंटरेस्ट वाटतो नाहीतर मग अशा ऐतिहासिक कथा डॉक्युमेंटरी वाटण्याची भीती असते. ज्यांनी पहिला एपिसोड बघितला आणी जे पुढेही सिरीयल बघणार असतील ते या लेखाला पतिसाद देऊ शकतात, चर्चा करू शकतात.