Skip to main content

पालेस्तिन इस्रायल चित्तरकथा पॅलेस्टाईन यहुदी ज्यू

पालेस्तिनातल्या इस्रायलच्या निर्मितीची चित्तरकथा

लेखक नठ्यारा यांनी रविवार, 15/10/2023 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो, आज इस्रायल देश जिथे आहे त्याचं पारंपरिक नाव पालेस्तिन म्हणजे पॅलेस्टाईन आहे. तर तिथे इस्रायल कोणी व कसं वसवलं, हे या लेखात मांडायचा यत्न करतो आहे. या प्रक्रियेतच भावी संघर्षाची बीजं रोवली गेली आहेत. हमासने तसेच इस्रायलने केलेल्या अत्याचारांचा निषेध करायलाच हवा. निरपराध लोकं तडफडून मरू लागली की काही शक्तींना आनंद होतो. यांत इस्रायली प्रस्थापितांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. दीर यासीन, अल दवायमा या ठिकाणच्या निरपराधी आणि संबंधित नसलेल्या पालेस्तिनी नागरिकांची कत्तल करतांना इस्रायलच्या खाटिकांना फार शौर्य गाजवल्यागत चेव चढला होता. तोच चेव आज हमासला चढला आहे.