Skip to main content

ऑटोमोबाईल

कार्स आणि बाईक्स

लेखक गवि यांनी मंगळवार, 13/11/2018 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
कार्स, बाईक्स आणि एकूण ऑटोमोबाईल या विषयावर अपडेट्स ठेवण्यासाठी आवश्यक असलेली चर्चा इथे व्हावी म्हणून हा धागा. चालू घडामोडी या धाग्यात आगोदर प्रतिसाद म्हणून लिहिल्यावर तिथे तो मजकूर योग्य नसल्याचं वाटलं. मुख्यतः नवीन वाहनं, मॉडेल्स, जुन्या वाहनांच्या नव्या एडिशन्स हे विषय गेल्या काही महिन्यांत सुसंगत झाले असं वाटतं. सॅन्ट्रो नव्या रुपात, Datsun Go फेसलिफ्ट लॉन्च, टाटा हॅरीयर आगमन वगैरे या हायलाईट्स. शिवाय आणखी एक विषय , २०१९ साली नवीन (आणि कदाचित जुन्याही) वाहनांसाठी काही कंपल्सरी बदल / उपकरणे इत्यादि घोषित झाली आहेत असं वाचलं. ही घोषणा बरीच जुनी असावी.