Skip to main content

नवे पुस्तक प्राचीन भारत

डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे नवे पुस्तक प्राचीन भारत, इतिहास आणि संस्कृती

लेखक कोकणप्रेमी यांनी शनिवार, 10/10/2015 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
अपरांतचे नवीन पुस्तक “प्राचीन भारत इतिहास व संस्कृती“ ज्येष्ठ इतिहास संशोधक व डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लिहीलेल्या “प्राचीन भारत इतिहास व संस्कृती“ या पुस्तकातुन वाचकांना पहिल्यांदाच मराठीतुन आपल्या गौरवशाली इतिहास व संस्कृतीची अद्ययावत माहिती मिळते. या पुस्तकांत डॉ. देगलूरकर यांनी पाषाणयुगापासून १३व्या शतकापर्यंतच्या काळावर विस्ताराने माहिती दिली आहे. प्राचीन इतिहास, इंडॉलॉजी या विषयाच्या अभ्यासकांना हे पुस्तक विशेष उपयुक्त ठरणार आहे. हे पुस्तक ४५६पानी असुन भरगच्च माहितीसोबतच अनेक छायाचित्रेही असल्याने पुस्तकाची उपयुक्तता वाढली आहे.