Skip to main content

निवडणूक विश्लेषण

एरंडाचं गु-हाळ

लेखक परशु सोंडगे यांनी रविवार, 12/03/2017 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
एरंडाचं गु-हाळ निवडणूक निकालाचं विश्लेषण भाजपानं उत्तरप्रदेशावर कब्जा केला. अनेक ठिकाणी भाजप पक्ष वाढतोय.म्हणजे सत्ता काबिज करतोय.जो सत्ता काबिज करतो तोच पक्ष श्रेष्ठ म्हणायची प्रथा सुरू झालीय. आता काॅग्रेस मुक्त भारत करायचं स्वप्न मोदीच खरं ठरतयं की काय असं वाटत असतानी पंजाब मध्ये एक तर्फी कौल काॅग्रेसला दिला गेला. लोकशाहीत हेच होणं अपेक्षित आहे. विरोधी पक्षाचं बळ ही लोकशाही मूल्यासाठी अवश्यक असतं. आता सारेचं विजय मोदीच्या नावाने खूप लागले आहेत. राहूल गांधीचा पराभव मानू लागले आहेत.अशी दोन व्यक्ती मध्ये तुलना का करायची ?